"नीरज ही गाथा, वत्सलतेची मातृसंहिता" लक्ष्मीकांत तांबोळी यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020
  • सेलू येथील जयश्री सोन्नेकर लिखित व मयूर प्रकाशनातर्फे मुद्रित 'नीरज' या पुस्तकाचे प्रकाशन महेश गिरगावकर यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले.

नांदेड :-  सेलू येथील जयश्री सोन्नेकर लिखित व मयूर प्रकाशनातर्फे मुद्रित 'नीरज' या पुस्तकाचे प्रकाशन महेश गिरगावकर यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत अतिशय अनौपचारिक वातावरणात हा कार्यक्रम घेण्यात आला. आरंभी सोन्नेकर यांनी पाहुण्यांचे शाल आणि पुष्पहार देऊन स्वागत केले. डॉ. वृषाली किन्हाळकर,  ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी, सिद्धहस्त साहित्यिक डॉ. सुरेश सावंत,  मयूर प्रकाशनाचे सतीश कुलकर्णी,  चित्रकार नयन बारहाते यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. किन्हाळकर यांनी ही माता आणि बालकाच्या नाळबंधाची कहाणी आहे, अशा शब्दांत पुस्तकाचे वर्णन केले. वाचताना एकेक वाक्य अंतःकरणपूर्वक वाचत गेले असंही त्या म्हणाल्या. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी "आईच्या ह्या अपूर्व मातृसंहितेस काय नाव द्यावे अशा संभ्रमात होतो! 'असे सांगितले, डॉ. सुरेश सावंत यांनी वाङ्मयप्रकारांची चौकट मोडणारी ही कलाकृती असून, माऊलीला पडलेल्या अनेक प्रश्नांचे “प्रश्नोपनिषद' म्हणजे नीरज” असे गौरवोद्गार काढले. सतीश कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया कथन केली. नीरजचे सुबक मुखपृष्ठ साकारणारे नयन बारहाते यांनी पुस्तकाचे बारकाईने विश्लेषण केले "सर्वांबद्दल सकारात्मकता व्यक्त करणारे हे पुस्तक लेखिकेचे नसून ते केवळ आईचे आहे, असं ते म्हणाले.

"मरण जगतानाही ओठांवर हसू ठेवणाऱ्या गुणी मुलाबद्दल लिहावंच वाटलं "असा पुस्तक लेखनामागील हेतू लेखिका जयश्री सोन्नेकर यांनी स्पष्ट केला आणि सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. कौसडीकर यांनी केले. कार्यक्रमास निवडक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News