एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समझोता, समायोजन, समजून घेणे कठीण होत निघालंय. त्यामुळे नातं काय असतं? त्याचे महत्त्व काय? त्याची जोडून ठेवण्याची गरज आज समजेनाशी झाली आहे. कारण कौटुंबिक सुख-समाधानाची संकल्पनाच कालबाह्य होत निघाली असून स्वत:मध्येच रमणं आणि आत्ममग्नतेचीच स्थिती बहुसंख्य कुटुंबांमध्ये दिसत आहे. दुसऱ्यासाठी झटणं, त्याग करावा लागणं, वर्तन हे ‘शेअरिग आणि केअरिंग’ या नीतीला धरून आहे, असे दिसेनासे झाले आहे.
आज तर एकच मूल परवडतं असा जमाना. घरात माणसं कमी, मग मूल पाळणाघरात वाढणं अपरिहार्य. परिणामी मानसिकदृष्ट्या दुरावलं. खरे पाहिले तर पहिले मूल स्वत:साठी म्हणजे पालकांसाठी आणि दुसरे मूल पहिल्यासाठी ही नीती हवी. पण तसं तर घडेनासं झालं आहे. यामुळे सोशलायझेशनची तर वानवाच. कौटुंबिक नात्यात आटलेपणा.
संवादाचा अभाव हेच महत्त्वाचे कारण जे नाती संबंध ओळखणं, वाढवणं, संवर्धित करणं, भावनिक आधार, मानसिक निचरा न करण्याचे कारण ठरत आहे. वाढत्या वयात तर मुलं जन्मदात्यांना विस्मरणात टाकण्याकडे वळत आहेत. कारण बंधन नको, स्वातंत्र हवे. पुढे तर सून व मुलगा यांचे अगदी स्वतंत्र युनिट. तेव्हा जन्मदात्यांना सांभाळणे हे कर्तव्यच नाही असे वर्तन. खरे तर मानसिक रुक्षता, भावनिक ताठरपणासुद्धा दिसतो कृतीतून, नात्याचा गोडवा राखण्याचं भान नाहीच व गरजही वाटत नाही. अशीच तर कौटुंबिक सामाजिक स्थिती. पोषाखही जणू साजेसा... तो तर उच्चशिक्षित पिढी वाकेना! नमस्कारासाठी खाली झुकेना!
चुकांची कबुली नाहीच द्यायची!
अहंकार कुरवळत तोऱ्यात राहायचीएकमेकांचं मन राखण्याचं भान! नात्यांची जाण ठेवायची कोणी?स्वातंत्र्य म्हणजेच स्वैराचाराचा परवाना अशी काहींची धारणा कारण ते तर कौटुंबिक जबाबदारी टाळण्यासाठीचा आधुनिक ट्रेण्ड. खरे पाहता स्वातंत्र्य, समानता, पर्सनल स्पेस, प्रायव्हसी अशासारख्या बाबी प्रत्येक नात्याला मिळायला हव्यात. मात्र त्यामुळे दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता व ती तत्त्वे स्वीकारून अगदी एकटे मजल गाठणं घडत नाही ना याची काळजी घ्यायला हवी तरच नाती टिकतील. कौटुंबिक शिष्टाचार व पारंपरिक संस्कृतीचे संस्कार हेच जुनाट, कालबाह्य, टाकाऊ मानून भिरकावून देण्याची आजची नीती ही नात्यांची ओळख जाण व मान कशी राखतील?
नात्याचा गोडवा अनुभवणं तर दुरापास्तच. टी.व्ही.चा पगडा, मोबाईलचं व्यसन, इलेक्ट्रॉनिक माध्यम साधनांची जवळीक व जबरदस्त ओढ वापरायची ही स्थिती माणसाला माणसापासून दुरावत नेत आहे. एकमेकांबद्दल ओढ, परस्परांविषयी प्रेम, सहसंबंधात विश्वास अव्यक्त ठेवण्याचं झपाटलेपण आणत आहे. नात्याची नीती, प्रीती सांभाळण्यातील आजचा हा जबरदस्त अडसर ठरत आहे. भावनेचा ओलावा विचार व्यक्त करणं, समोरासमोर राहून, बोलून, भेटून, डोळे भिडवून व्यक्त होणं होईनासं झालं आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, प्रतिष्ठेच्या, चैनी चंगळवादी समजुती, अश्लील दृश्ये व गाणी, दहशतवाद यांचा धुमाकूळ असलेले सिनेमे पाहण्यावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मेंदू बधिर, भावना बोथट, तर नात्यांमधील आत्मीयतेची भावना लयास जात आहे.
खरं तर भारतीय संस्कृती महान आणि मूल्येसुद्धा महनीय की जी नाती जोडायला, सुरक्षित ठेवायला संवर्धित करायची शिकवण देणारी परंतु आज पैसा, पद, प्रॉपर्टी, प्रतिष्ठा, उन्नती याचाच पाठलाग करण्याची जणू कट ऑफ कॉम्पिटिशन, रॅट रेस जणू या मूल्यांचाच जमाना. खरे तर जिंकण्याचा अतिरेकी जुनून आणि स्पर्धेचे क्रौर्य, अत्याचाराची रेलचेल अशा स्थितीत नात्याची जपवणूक व जवळीक राहणार कशी?आज नव्याने भारतीय महान संस्कृतीचे स्मरण करायला हवे. त्यांची शिकवण, नीतीमूल्यांचा कास, संस्कृतीचे अनुकरण केले.