कोरोनास्थितीत सकारात्मक विचारांसह नव्या ट्रेंडनुसार कार्य करण्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 July 2020

कोरोनापूर्व काळात तणावाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होते.जेणेंकडून तणाव कमी होण्यास मदत होत होती, परंतु कोरोनामुळे सिनेमागृह,पर्यटन, मित्रांसोबत फिरणे या सर्व गोष्टींवर बंधने आलेली आहेत.

औरंगाबाद : कोरोनापूर्व काळात तणावाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होते.जेणेंकडून तणाव कमी होण्यास मदत होत होती, परंतु कोरोनामुळे सिनेमागृह,पर्यटन, मित्रांसोबत फिरणे या सर्व गोष्टींवर बंधने आलेली आहेत. त्यामुळे अशा परिस्थिती घरात बसून राहण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय लोकांकडे राहिलेला नाही. म्हणूनच कोणत्याही नकारात्मक दिशेला न जाता सर्व काही ठीक होईल असे  मानसोपचारतज्ञ्ज व समुपदेशक डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले आहे 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मानवी जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्याचबरॊबर अनेकांचे रोजगार गेल्यामुळे त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला असून त्यांच्यामधील आत्मविश्वास कमी होत चालला आहे. तर अशा परिस्थितीत खचून न जाता शांत आणि सकारात्मक पद्धतीने विचार करून नव्या संधीचा शोध घेत बदलत्या ट्रेंडनुसार कार्य करण्याची गरज असल्याचे समुपदेशकांनी मत व्यक्त करत काही उपाय सुचविले आहेत 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी.. 

  •  तणावाचे कारण जाणून घ्या. 
  • दररोज ध्यानधारणा, आणि व्यायाम करा. 
  • नेहमी सकारात्मक विचार करा. 
  • आपल्या मनातील गोष्टी मित्र आणि जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा.
  • स्वतःसाठी वेळ द्या. 
  • स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित करा आणि रिलॅक्स राहा.
  • व्यक्तिमत्वाची खरी कसोटी 

    •  कोरोना काळात तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी कसोटी आहे. 
    •  रोजगार गेल्याने हताश न होता नवीन संधी शोधा. 
    •  स्वतःमधील कमजोरी शोधा.
    •  दीर्घकाळ टिकेल अशा व्यवसायाकडे लक्ष द्या. 
    •  भविष्यात सेवा सेक्टरमध्ये संधी आहेत त्याकडे लक्ष द्या.     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News