N.C.C चा कम्बाईन ऍनिवल ट्रेनिंग कॅम्प

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 12 December 2019

कडेट्स वर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या तसेच वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन याठिकाणी घेण्यात आलेत. यामध्ये वेपन ट्रेनिंग, ड्रिल, हेल्थ अँड हायजिन, जगिंग डिस्टन्स, फर्स्ट एड, फिजिकल फिटनेस अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्यात.

अमरावती : ग्रुप एन. सी. सी. यांच्या अंतर्गत येणाऱ्या 11 महाराष्ट्र बटालियन, अकोला यांचा कम्बाईन ऍनिवल ट्रेनिंग कॅम्प - 123 हा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दि. 3 डिसेंबर 2019 ते 12 डिसेंबर 2019 पर्यंत संपन्न झाला. यामध्ये 11 महाराष्ट्र बटालियनमध्ये मोडणाऱ्या विविध शाळा व महाविद्यालयाचे एकूण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कॅम्पसाठी 11 महाराष्ट्र बटालियन अकोल्याचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संजय पांडे व ऍडमिनिस्ट्रेटर ऑफिसर लेफ्टनंट कर्नल राजीव बक्षी यांच्या अंतर्गत या कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये कडेट्स वर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या तसेच वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन याठिकाणी घेण्यात आलेत. यामध्ये वेपन ट्रेनिंग, ड्रिल, हेल्थ अँड हायजिन, जगिंग डिस्टन्स, फर्स्ट एड, फिजिकल फिटनेस अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्यात. तसेच विविध तज्ञ वक्ते बोलावून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले. कॅम्प समारोपा दिवशी वेगवेगळ्या कल्चरल प्रोग्राम घेऊन कॅम्प फायर करण्यात आला.

या कॅम्पसाठी एन.सी.सी. ऑफिसर म्हणून लेफ्टनंट श्वेता मेंढे, सेकंड ऑफिसर राजेश अहाळे, फर्स्ट ऑफिसर प्रशांत पावडे,चीफ ऑफिसर पराग राऊत, सेकंड ऑफिसर विक्रम पवार व थर्ड ऑफिसर खच्चकड यांचा सहभाग होता. तसेच या संपूर्ण कॅम्पच्या आयोजन व नियोजन मध्ये बटालियन चे सुभेदार मेजर रमेश भुसारी यांचे मार्गदर्शन लाभले. असे श्रीमती एल. आर. टी. कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजचे एन.सी.सी. ऑफिसर लेफ्टनंट डॉ. अनिल तिरकर यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News