सृजनशील चित्रकार नयन बाराहाते यांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 20 March 2019

नांदेड : येथील ख्यातकीर्त चित्रकार, प्रतिभावंत व सृजनशील कलावंत नयन बाराहाते यांना अमरावतीच्या स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱया ‘उत्कृष्ट मुखपृष्ठकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नांदेड : येथील ख्यातकीर्त चित्रकार, प्रतिभावंत व सृजनशील कलावंत नयन बाराहाते यांना अमरावतीच्या स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱया ‘उत्कृष्ट मुखपृष्ठकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे हे या ट्रस्टचे अध्यक्ष असून ट्रस्टच्या वतीने उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांतर्गत नयन बाराहाते यांना उत्कृष्ट मुखपृष्ठाचा राज्यस्तरीय  पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रूपयांचा धनादेश, स्मृतिचन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन एका भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात नयन बाराहाते यांचा सन्मान अमरावती ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डाहाके आणि रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत नयन बाराहाते यांना प्रथितयश कवी मनोज बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
नयन बाराहाते हे महाराष्ट्रातील विख्यात चित्रकार असून आजपर्यंत त्यांनी देशभरातील आणि राज्यातील नामवंत लेखक, साहित्यिक, कवींच्या पुस्तकांचे तसेच विविध श्रेणीतील अक्षरशः हजारो पुस्तके, ग्रंथांची मुखपृष्ठे साकारली आहेत. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सचोटी, गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर नियोजन ही कामाची त्रिसूत्री असलेल्या नयन बाराहाते यांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात विशेष रस आणि ममत्व आहे. 
उत्कृष्ट मुखपृष्ठासाठीचा स्व. सूर्यकांतादेवी पोटे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नयन बाराहाते यांचे मधुकर धर्मापुरीकर, डॉ. वृषाली किन्हाळकर, दैनिक उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर, प्रा.डॉ. केशव सखाराम देशमुख, प्रा. मनोज बोरगावकर, डॉ. सुरेश सावंत, संदीप काळे, रेवती गव्हाणे, शर्मिष्ठा भोसले, डॉ. नितीन जोशी, डॉ. अच्युत बन आदींनी अभिनंदन केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News