नक्षलवादी घेणार आरोग्य पथकांच्या सुरक्षेची जबाबदारी

अनिश पाटील
Saturday, 18 April 2020

नक्षलवादी संघटनांनी समाज माध्यमांवरून व्हिडीओद्वारे सरकारला गडचिरोली, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील आदिवासींवर औषधोपचार करण्याचे आवाहन केले होते.

मुंबई : नक्षलवादाला सोडचिठ्ठी दिलेल्या 80 जणांची पोलिसांनी वैद्यकीय चाचणी केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवादविरोधी पथकाने गडचिरोली, धुळे, नंदुरबार या ठिकाणी चाचणी केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

शरणागत नक्षलवाद्यांची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे. नक्षलवादी संघटनांनी समाज माध्यमांवरून व्हिडीओद्वारे सरकारला गडचिरोली, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील आदिवासींवर औषधोपचार करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी शस्त्रसंधी केल्याची आणि शरणागती पत्करण्याची घोषणाही केली होती. आदिवासींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी येणाऱ्या आरोग्य पथकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली होती.

या जिल्ह्यांतील सरकारी दवाखांन्यात वैद्यकीय तपासणी सुरू झाली आहे. शरण आलेल्या नक्षलवाद्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश नक्षलवादविरोधी पथकाला मिळाले होते. या सर्वांना वेगळी ओळख देऊन वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन जिल्ह्यांत जाऊन या 80 जणांची चाचणी केली. हे सर्वजण व्यवस्थित असल्याचा अहवाल नक्षलवादविरोधी विशेष मोहीम विभागाला पाठवण्यात आला आहे.

सर्वांचे आरोग्य उत्तम राज्यात 2013 पासून आतापर्यंत शरण आलेल्या या माजी नक्षलवाद्यांची नावे सुरक्षेच्या कारणामुळे जाहीर करण्यात आलेली नाहीत. तपासणी केलेल्या सर्वांचे आरोग्य चांगले असल्याचे आढळले आहे. धुळे, नंदुरबार, गडचिरोली जिल्ह्यांत कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झालेला नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News