नवरात्रीत फोटो स्टेटसला टाकण्यापेक्षा स्त्रियांना मनातून सन्मान द्या

डॉ निकिता पवार
Saturday, 24 October 2020

प्रत्येक सणाला डॉक्टर, नर्स, पोलीस,सफाई कर्मचारी सगळ्यांचेच फोटो व्हायरल होताना दिसत आहेत, पण फोटो स्टेटसला टाकण्यापेक्षा मनातून एकदा जरी तिला सन्मान दिला ना तरी तो लाखमोलाचा ठरेल

नवरात्रीत फोटो स्टेटसला टाकण्यापेक्षा स्त्रियांना मनातून सन्मान द्या

आज कोरोना नसता तर जागो जागी अनेक मंडळ उभे राहिले असते, मोठं -मोठ्याने गाणे वाजवत उत्सव झाले असते, त्या पैशातून अनेक लोकांचे घर चालले असते, प्रत्येक जण नेहमी प्रमाणे नवरात्री म्हणजे नऊ दिवस -नऊ कलर या प्रमाणे तयार होऊन फिरले असते ,पण त्याच कार्यक्रमाला येणाऱ्या महिला किव्हा मुली किती सुरक्षित राहिल्या असत्या हे सांगता आलं नसत . कारण जिच्या नावाने हा कार्यक्रम सादर करताय तिचाच सन्मान होतोय का ? हे कोणासाठीच महत्वाचं नाहीये...

असं म्हणतात की या काळात देवीचं प्रत्येक रूप आपल्याला स्त्री शक्तीचा जागर देऊन जात, हो आपण नेहमी च म्हणतो की स्त्री शिक्षित होतेय,स्वतःच्या पायावर उभी राहतेय ,स्त्री आणि पुरुषातला भेद संपवतेय, पण खरच तिला तो मान- सन्मान मिळतोय का ?,ती स्वतःच्या हक्कांसाठी लढतेय का?, किंबहुना ती लढली तरी तिला न्याय मिळतोय का? खरच स्त्री शक्तीचा जागर होतोय का ?

एखाद्या देशाची प्रगती मोजायची असल्यास त्या प्रदेशातील शिक्षित स्त्रीयांची संख्या मोजली जाते का ? याच उत्तर अगदी सोप्प आहे,आपण नेहमी एक वाक्य वाचतो "मुलगी शिकली प्रगती झाली!" किंवा "एक स्त्री शिकली की दोन घरांची प्रगती करते!"कारण स्त्री एक अशी शक्ती आहे की ती सर्व काही बदलू शकते पण  अस होतंय का ? नाही ....का तर तिला हवा तसा तिचा सन्मान मिळत नाही , अजून ही लोक तिच्याकडे त्याच नजरेने बघताय, अजून ही ती तिच्या हक्कांसाठी लढतांना दिसतेय, अजून ही ती पंख पसरून उडण्यास घाबरतेय, अजून ही ती रोज मार खातेय,  अत्याचार सहन  करतेय. शिवरायांच्या काळात स्त्री कडे वाकड्या नजरेने बघितलं तरी त्याला शिक्षा केली जात होती , आणि आता तेच गुन्हे करणारे सहजासहजी फिरतांना दिसतात , आधी त्यांना शिक्षा करा म्हणजे स्त्री च महत्त्व त्यांना कळेल ,आणि स्त्री चा सन्मान होईल!

गुलझार साहेब ने बोहत सही काहा है....."कब्र से भी गहरा होता है ,सब्र स्त्री का "!  कारण जो पर्यन्त ती शांत आहे ,सहन करतेय तो पर्यन्त ठीक आहे ....पण जेव्हा ती रौद्र रूप धारण करते तेव्हा तिचा सामना करण अवघड आहे . सध्या कोरोना मुळे का असेना  प्रत्येक सणाला  डॉक्टर, नर्स, पोलीस,सफाई कर्मचारी, सगळ्यांचीच फोटो व्हायरल होतांना दिसतायेत ,पण फोटो स्टेटस ला टाकण्यापेक्षा  मनातून एकदा  जरी तिला सन्मान दिला ना तरी तो लाखमोलाचा ठरेल  आणि त्यामुळेच ती समाजात ताठ मानेने जगू शकेल, आणि खऱ्या अर्थाने "स्त्री शक्तीचा जागर" होईल! 

- डॉ निकिता पवार

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News