दिल्लीमधील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द - मनीष ससोदिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षांबाबत एक पत्र लिहीले आहे. तसेच केंद्रीय विद्यापीठांच्याबाबत केंद्राने निर्णय घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री मनीष ससोदिया यांचं मत आहे. 

दिल्लीमधील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द - मनीष ससोदिया

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढताना दिसतोय, अशातच देशभरात कोणत्याही राज्याची परीक्षा घेण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रासह दिल्लीत सुध्दा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने अरविंद केजरीवाल सरकारने विद्यापीठातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष ससोदिया यांनी विद्यापीठातील सर्व परीक्षा रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल असंही त्यांनी सांगितले आहे. 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष ससोदिया यांनी दिल्लीतील सर्व विद्यापीठाना विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा रद्द करून प्रमाणपत्र तयार करण्याच्या सुचना नुकत्याच दिल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भविष्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच हा निर्णय राज्यातील सर्व विद्यापीठांना लागू असल्याचे सुध्दा उपमुख्यमंत्री मनीष ससोदिया यांनी जाहीर केले आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षांबाबत एक पत्र लिहीले आहे. तसेच केंद्रीय विद्यापीठांच्याबाबत केंद्राने निर्णय घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री मनीष ससोदिया यांचं मत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News