लग्नाच्या दुस-या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, १०० पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

नवरदेव हा गुरूग्राम या ठिकाणी नोकरी करीत होता, तसेच तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता. काही दिवसांपूर्वी लग्न असल्यामुळे पटना परिसरात आला होता. नवरदेवाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पटना येथील आरोग्य यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

पटणा - देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून केंद्र आणि राज्य सरकारने कडक नियमावली लागू केली होती. ज्या राज्यात लोकांनी लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला, त्या राज्यात कोरोनाची लागण झालेल्याची संख्या तुरळक प्रमाणात आहे. बिहारची राजधानी पटणामध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पटना येथील एका लग्नात जमलेल्या १०० व-हाडी मंडळीना कोरोनाचा संसर्ग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या दुस-या दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पटणातील आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. तसेच या प्रकरणामुळे लग्नाची चर्चा देशभरात चर्चेची ठरली आहे.

नवरदेव हा गुरूग्राम या ठिकाणी नोकरी करीत होता, तसेच तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता. काही दिवसांपूर्वी लग्न असल्यामुळे पटना परिसरात आला होता. नवरदेवाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पटना येथील आरोग्य यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

ही घटना पटना जिल्ह्यातील पालीगंज गावातील आहे. कोरोना संसर्ग झाल्याचा आरोग्य विभागाच्या लक्षात येताचं त्यांनी गावातील नागरिकांच्या कोरोना चाचणी सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याचं हे बिहार मधील पहिलं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. 

नवरदेवाची कोरोना चाचणी न होण्याविषयी प्रशासनाने म्हटलं आहे, “नवरदेवाच्या मृत्यूची माहिती मिळून त्याची चाचणी घेण्याआधीच मृताच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर अंतिमसंस्कार केले.”

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News