प्रकोप निसर्गाचा

श्रीपाद यशवंत देशपांडे
Tuesday, 20 August 2019

कसा वाचवू सांग माझ्या यशोदेचा कान्हा
वासरू गेलंय वाहून तिचं कसा फुटेल पान्हा

कुठे सोडावी मुकी जनावरं
बुडालीत आमची घरं दारं
कशी वाचवावी बायका पोरं
वाहून चाललंय पुरात सारं

कसला हा प्रकोप निसर्गाचा
तुम्ही केलेल्या पाणी विसर्गाचा
खेळ मोडलाय साऱ्या संसाराचा
प्रयत्न करतोय जिव वाचवायचा

जगलो वाचलो तर जोडीन सगळं पुन्हा
वाहून गेलंय सारं काय आमचा गुन्हा
कसा वाचवू सांग माझ्या यशोदेचा कान्हा
वासरू गेलंय वाहून तिचं कसा फुटेल पान्हा

वाहून गेलेली घरं कदाचीत पुन्हा उभी रहातील
ज्यांची माणसं गेली सांगा ते कुणाकडं पाहतील
सरकारचं काय पूरग्रस्तांना निधी जाहीर करतील
तुमच्या काही चुकांमुळे निरपराध माणसं मात्र मरतील

मंदिरातले देव सुद्धा पाण्यामधे बुडलेत 
जीव वाचवणारे जावान आता देव भासू लागलेत 
जात धर्म विसरून सारे मदतीला धावलेत 
हिंदू मुस्लिम सीख इसाई माणुसकीला जागलेत

नका काढत बसू सेल्फी जखमांचा आमच्या 
कोणीतरी रडत असेल मदतीसाठी तुमच्या
जगलो तर पुन्हा घेवू ताट वाटी चमच्या 
जीव वाचवा इतरांचा पाया पडतो तुमच्या

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News