#NationYouthDay जिद्दीच्या जोरावर गाठले 'मल्लखांबाचे' शिखर

रसिका जाधव (यिनबझ)
Monday, 13 January 2020
  • मल्लखांब हा पारंपरिक खेळ आहे.
  • या खेळात मुलांचा सहभाग असतोच पण आता लोकांचा दृष्टीकोन बदल्यामुळे मुली सुध्दा यात खेळू लागल्या आहेत.
  • अशाच एका 18 वर्षाच्या अमिषाने मल्लखांब मध्ये करियर करण्यासाठी मल्लखांब हा खेळ निवडला आहे.

मल्लखांब हा पारंपरिक खेळ आहे. या खेळात मुलांचा सहभाग असतोच पण आता लोकांचा दृष्टीकोन बदल्यामुळे मुली सुध्दा यात खेळू लागल्या आहेत. अशाच एका 18 वर्षाच्या अमिषाने मल्लखांब मध्ये करियर करण्यासाठी मल्लखांब हा खेळ निवडला आहे. अमिषा पंकज पटेल. त्या ठाण्यातील येऊर मध्ये राहतात. वयाच्या 13 वर्षी पासून मल्लखांब करण्याची आवड निर्माण झाली. तेव्हाच मनाशी निश्चिय केला की, यातच आपल करियर करायचे. तेव्हा त्या 8 वीत शिकत होत्या. या खेळासाठी त्यांची आई तयार नव्हती पण त्यांनी आईला समजावल त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्या असच येऊर मध्ये मल्लखांब बघण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हाच त्यांना ते खूप आवडल आणि तेव्हात मनाशी खूण गाठ बांधली की आपल करियर यातच करायचे. अमिषाला समजले होते की, हा खेळ आपण खेळलो तर आपले शरीर तदुरूस्त राहते. त्या दोन महिन्यात मल्लखांब शिकल्या आहेत. पाच महिन्यातच त्या राज्यपातळीवर खेळण्यासाठी त्यांची निवड झाली.  

त्यांच्या घरी त्यांची आई,बाब, दोन बहिणी आणि एक भाऊ आणि स्वत: अस त्यांच कुटुंब आहे. अमिषा दररोज दोन तास सराव करतात. सध्या त्या पुढच्या महिन्यात विद्यापीठात के.जी.जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रतिनिधित्व करून खेळणार आहेत. त्यांना या क्षेत्रात येऊन पाच वर्ष झाले आहेत. त्या सलग पाच वर्ष राज्यपातळीवर खेळत आहेत. 2019 मध्ये ठाणे महापौर चषक मध्ये तिसरा क्रमांक मिळाला आहे. महापौर स्पर्धेत सर्वौकृष्ट खेळाडू महिला बक्षीस भेटले आहे.  त्यांना राष्ट्रीय पातळीवर खेळायचे आहे. तसेच विद्यापीठात खेळून महाविद्यालयाचे नाव मोठे करायचे आहे. तसेच हा भारतीय काळातील पारंपरिक खेळ आहे.  बाजीराव पेशवे दुसरे यांना या खेळाची सुरूवात केली. त्यांना हा खेळ जगभरात पसरवायचा आहे. 

बी.एम.एम पदवीधर झाल्यानंतर त्यांना बी.पी.ए.ड करायचे आहे. कारण त्यांना मल्लखांब प्रशिक्षक व्हायचे आहे. या पाच वर्षातील सर्वात जास्त आवडलेला क्षण म्हणजे 2019 रोजी पाडव्याला ठाणे येथे प्रभात फेरी मध्ये नवारी नेसून मल्लखांब करणे हा अनुभव त्यांच्यासाठी खूप मस्त होता. लोकांना सुध्दा त्यांचा कार्यक्रम खूप आवडला त्या नंतर त्यांच्या अॅकडमीत प्रवेश जास्त झाले. 

"जे आई-वडिल सांगतात ते एकावे ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. मुलांनी मोबाईल मध्ये गेम खेळत बसण्यापेक्षा तोच त्यांचा वेळ मैदानी खेळांना दिला पाहिजे. कारण मैदानी खेळाकडे मुलांचे दुर्लक्ष होते आहे. मैदानी खेळ खेळल्यामुळे फायदा होतो. मैदानी खेळ खेळल्यानंतर शरीर तदुरूस्त राहते. मोबाईल मध्ये गेम खेळल्याने नुकसानच होते." 

डेमो लेक्चरला मुलीना येऊन देत नाहीत तेव्हा मुलांनाच बोलवले जाते. पण नंतर खेळातान मुली खेळल्या तर चालतात. फक्त डेमो लेक्चरला मुलीना खेळायची संधी दिली जात नाही. मुलगी आणि मुलगा असा भेदभाव नसला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात मुली प्रगती करत आहेत. मग समाज का अजून असा भेदभाव करतो आहे.     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News