#nationalYouthDay तारुण्यातील जीवनाला आकार देणारं मैत्रकूल जीवन विकास केंद्र

यिनबझ टीम
Monday, 13 January 2020

भारतात अनेक आणि वेगवेगळ्या संघटना आहेत. ज्या तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करतात. त्यांच्या ध्येयपुर्तीसाठी काम करतात. अशीच एक संघटना गेले कित्येक वर्षे मुंबईमध्ये कार्यरत आहे. इथे फक्त तरुणांच्या करिअरचा विकास होत नाही, तर त्यासोबत त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या समृध्दीचा, संस्कारांचा विकास होतो. ती संघटना म्हणजे मैत्रकूल जीवन विकास केंद्र. याच केंद्राबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

मैत्रकूल जीवन विकास केंद्र गेली तीन वर्षे बापगाव, कल्याण येथे सुरू आहे. मैत्रकूल हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेला मार्ग आहे. मैत्रकूलची सुरवात अगदी अल्पश: गोष्टींसोबत झाली. पुरेसं आणि गरेजचं साहित्य न्हवतं, ना हातात पैसे होते पण मनात जिद्द होती. मैत्रकूल सुरू करण्याचे कारण एकच होतं, ते म्हणजे आम्ही जे शिक्षण घेण्यासाठी सहन केलं, ते आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये. त्यामागे ही प्रामाणिक भावना होती.

मैत्रकुलचा दिवस सकाळी 5.30  वाजता राष्ट्रगीत आणि संविधानाच्या प्रस्तावनेने सुरु होतो. सोबतच प्रार्थना आणि व्यायामही केला जातो. त्यानंतर आपल्या-आपल्या ग्रुपची कामे केली जातात, म्हणजे मैत्रकुलची कामे सुरळीत व्हावी ह्यासठी साफसफाई, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, दुपारची भांडी साफ करणे, रात्रीची भांडी साफ करणे यासाठी ग्रुप पाडले जातात आणि दर 15 दिवसांनी हे ग्रुप बदलेले जातात. म्हणजे प्रत्येकाला सगळी कामे करण्याची संधी मिळते. अर्थात हे सर्व आपलं कॉलेज, शिक्षण करूनच केलं जातं. कोणतेही काम इथे मुलगा व मुलगी म्हणून विभागले जात नाही. अगदी मूलही इथे चपात्या बनवतात व मंडईतून भाजी आणतात, साफसफाई करतात आणि मुलीही कोणत्याच कामात मागे हटत नाहीत.

मैत्रकुलचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेली साथ नावाची जागा. सगळ्यांनी मिळून ही जागा एका विशेष कारणासाठी बांधली आणि ते म्हणजे आपल्यातले होणारे गैरसमज, भांडण तिथे जाऊन सोडवायचे. मैत्रकुलमध्ये मतभेद असले तरी चालतील पण मनभेद नकोत अशी संकल्पना आहे. लोकांकडून त्यांचे जुने सामान घेऊन आणि काही लोकांकडून अवघ्या 200 रुपयांच्या मदतीच्या जोरावर आज मैत्रकुल 47 विद्यार्थ्यांना घडवत आहे.

मैत्रकूलमध्ये आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी स्टोरी आहे. कोणी घरातल्या हालाकीच्या परिस्थितीमुळे जॉब करत होतं, कोणी drugs addict होतं, कोणी स्टेशन वर पिक पॉकेटिंग करायचं तर कोणी ब्रिजखाली राहायचं. कोण ना कोण आपल्या कलागुणांना सोडून आयुष्य काढत होतं. अशा सर्व विद्यार्थ्यांना मैत्रकूलने एक संधी दिली आणि आज त्यांचं आयुष्य मैत्रकूलच्या छताखाली बदलतंय. 

मला अभिमान वाटतो हे सांगायला की, मैत्रकूलमधील एक विद्यार्थिनी आरती गुप्ता जिने भावाच्या भांडणामुळे शाळा सोडली होती आणि आई-वडील आजारी असल्यामुळे काम करण्याच्या विचारात होती, ती मुलगी आज बागशाला आणि मैत्रकूलच्या संपर्कात आली आज ती SYBAला आहे आणि नुकतीच मिस अगरवाल (कॉलेज) झाली आहे.

आपल्याला जे काही मिळालंय ते परत समाजामध्ये दिलं पाहिजे, ह्या जाणिवेतून मैत्रकूल मधला प्रत्येक विध्यार्थी वस्तीत, बागेत, फूटपाथ, सिग्नलवर जाऊन इतर विध्यार्थ्यांना शिकवतो. शिक्षण सोडलेल्या तरुणांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो, कारण सहजच आजची तरुण पिढी वाया गेली, असं म्हंटल जातं; पण त्यांना संधी कोणी देत नाही.

मैत्रकूलचे संस्थापक, आमचे दादा म्हणजेच 'किशोरदा जगताप' असं म्हणतात की नवीन पिढीला संधी द्या व विश्वास दाखवा ते नक्की बदलतील. जेव्हा सगळ्यांनी नाकारलं होतं तेव्हा दादांनी आमच्यावर विश्वास ठेवून मनात नवीन उमेद जागी केली आणि त्यातून आज आमचं आयुष्य बदललं. याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपल्या मैत्रकूलचे पाईक राहुल घरत उर्फ रावस. हा लहानपणी चोऱ्या करायचा. पूर्ण परिवाराने त्याच्याकडून आशा सोडल्या होत्या; पण दादाच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या कालागुणंना तपासून दादांनी त्याला ATD करायला सांगितलं आणि तो महाराष्ट्रात 2रा आला. फक्त एवढंच नाही, तर त्याच्या निश्चयी आणि न्यायी वागण्यातून आज तो तरुणांमध्ये आधुनिक गांधी म्हणून ओळखला जातो. असा बदल फक्त मैत्रकुल आणि गणाईमध्येच होऊ शकतो, कारण इथे फक्त उच्च शिक्षणावरच भर नाही दिला जात तर सामाजिक भान देऊन आणि संविधानिक मूल्य पेरून एक चांगला माणूस बनण्यासाठी कार्य केले जाते.

मैत्रकुल सध्या भाडेतत्वावर आहे. स्वतःच्या जागेवर मैत्रकुल बांधून तिथे राहाणाऱ्या अनेक मुलांना हक्काचं घर द्यायचं आहे. तुमच्या एका मदतीमुळे हजारो मुलांचं भविष्य प्रकाषात येऊ शकते. त्यामुळे विचार करा आणि एकदातरी मैत्रकुलला भेट द्या, म्हणजे नक्कीच तुम्हाला मदत करावीशी वाटेल. मदतीसाठी डिटेल्स खाली दिल्या आहेत...

बँक डिटेल्स :
Chhatrashakti sanstha
Bank of Baroda (For building fund only)
Acount no. 34910100008577
Ifsc code: BARB0KHADAK (fifth character is zero)
Khadakpada branch
Kalyan (west)
संपर्क : 
9552014125
8850265397

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News