#NationalYouthDay जे यश माझ्या पदरी नाही, ते इतर विद्यार्थ्यांच्या पदरी नक्की घालणार - कमलेश जाधव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 January 2020

महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेच्या मागे लागले आहेत. त्यातल्या काहींना यश मिळतं तर काहींना यश मिळत नाही. ज्या विद्यार्थ्यांना यश मिळत नाही, ते सरळ आपला मार्ग बदलतात, पण एका मार्गावर आलेल्या अपयशामुळे आपला मार्ग न बदलता त्या मार्गावर अनेक पर्याय तयार करुन, इतरांना तरी त्या मार्गावरचे खाचखळगे दाखवण्याचं काम सध्या अनेक तरुण करतात. त्यातल्याच एक तरुण, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक कमलेश जाधव यांनी मांडलेला हा वृत्तांत, नक्की वाचा.

नमस्कार, जयहिंद 
मी कमलेश नारायण जाधव, कोल्हापूरपासुन 120 किलोमीटर असणाऱ्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथे राहातो. लहानपणापासुन मला भारतीय सैन्यादलामध्ये जाण्याची आवड निर्माण झाली होती. भारतीय सैन्यादलाची वर्दी बघुन माझ्या अंगांमध्ये एक संचार निर्माण झाला होता की आपण एक दिवस ही वर्दी आपल्या अंगावरती घालू.

या उद्देशाने सन 2009 ते 2011 यासाली ज्ञानसागर विद्यानिकेतन सैनिक पॅर्टन स्कुल, हसुरवाडी या ठिकाणी दहावीचे शिक्षण पूर्ण केले. सकाळ पेपरमध्ये एक लहान जाहिरात बघितली. डिफेन्स करिअर अकॅडमी, औरंगाबाद या ठिकाणी  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी खडकवासला या परीक्षेची तयारी करुन घेतली जाते, माझे गुरुवर्य श्री. केदार रहाणे संचालक डिफेन्स करिअर अकॅडमीचे आहेत. त्या ठिकाणी मी माझं नशिब आजमवण्याचा प्रयत्न केला. काही कारणास्तव माझे NDA चे राहिलेले स्वप्न अधुरच राहिलं. 

पण अपयश आले म्हणून खचुन जाणे ही शिकवण कदाचित अजूनपर्यंत मला कधी मिळालीच नाही, त्यामुळे आपण जे करू शकलो नाही, कदाचित माझ्या तालुक्यातील असंख्य तरुण करु शकतील अशा उध्देशाने मी तालुक्यामधये नवा प्रयोग सुरू केला. चंदगड तालुक्याला या मार्गदर्शनाची गरज आहे आणि म्हणून ते मार्गदर्शन करण्याचा संकल्प मी सुरू केला. संरक्षण सेवेमध्ये जाऊन एक अधिकारी स्वतःचे करिअर कशाप्रकारे करू शकतो, याची माहिती देणे हेच माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट्य समजून मी कामाला लागलो. आसपासच्या चंदगड, आजरा, गडहिग्लंज असे तालुके करत तब्बल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याभर जाऊन NDA  परीक्षेबद्दल माहिती सांगायची आणि संरक्षण विभागामध्ये जाण्याच्या सेवा संधींची माहिती मोफत देण्याचं काम मी सुरू केलं. 
 
राष्ट्रीय सेवा योजना या विभागामार्फत हलकर्णीच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला आणि त्यानंतर  माझे राज्यस्तरीय आव्हान 2016 शिबीरासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या माध्यमातून दहा दिवस आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलं. त्याचबरोबर राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय, नागपूर या ठिकाणी 20 दिवसांच्या प्रशिक्षणासाठीदेखील जाण्याची संधी मला मिळाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या मार्फत प्रसाद संकपाळ सर यांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलं. त्याचा फायदाही मोठ्या प्रमाणात मला झालेला दिसुन आला. 2019 मध्ये आलेल्या महापूरात पश्चिम महाराष्ट्राचे मोठे नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळालं. ते नुकसान जरी थांबवू शकतो नसलो तर त्यात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्याचं काम माझ्या हातून झालं. त्या महापुरामध्ये कोवाड या ठिकाणी रेस्कु आँपरेशन करुन  40 जणांना बाहेर काढलं. 

 इथे अभिमानाने सांगावेसे वाटते की युवकांनी समाजासाठी काय तरी करुन दाखवायला पाहिजे. जिद्द, चिकाटी, मेहनत करायची ताकद जर मनगटात असेल तर, मला वाटतय की कधीही तुम्ही आपल्या आयुष्यात कमी पडणार नाही. त्याच पद्धतीने मला सोशल मिडियाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याची संधी मिळते. एका whats app ग्रृपच्या माध्यमातून  अभ्यास केला जात असून प्रत्येकाजवळील अभ्यास साहित्य हे वॉट्स ग्रुपवरती पाठवत असून याचा फायदा प्रत्येक स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास घरबसल्या व्हाट्सअप तर्फे होत आहे. 

सदर ग्रुपवरती दररोजचे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे स्पर्धा परीक्षेला तयारीला आवश्यक असलेले वृत्तपत्र, विविध विषयांचे अभ्यासक्रम ऑनलाईन पुस्तके, नकाशे, राज्यघटनेचे तक्ते, मराठी इंग्रजी व्याकरण निबंध, ऑडिओ साहित्य, विविध विषयांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखक यांच्यातर्फे प्रसारित होत असतात. या ग्रुपमध्ये मार्गदर्शनाकरिता विविध अधिकारी, आयपीएस असिस्टंट कमांडंट, प्रांताधिकारी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आरटीओ इन्स्पेक्टर, जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, विविध विषयांचे तज्ञ, प्राध्यापक, पत्रकार, तलाठी या सर्व तज्ञ उच्च विभूषित व्यक्तींचे मार्गदर्शन वेळोवेळी विद्यार्थ्यांना मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

किरण चव्हाण (आयपीएस), अनिल चव्हाण (असिस्टंट कमांडंट), मेजर सुभाष सासने (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी), प्रसाद संकपाळ( जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी), गोपाळ पाटील, एकनाथ पाटील (विक्रीकर अधिकारी), जयराम पाटील, रेश्मा पाटील, श्रीकांत पाटील (पोलीस उपनिरीक्षक), आशालता गुट्टे  (मराठी व्याकरण  शिक्षिका), आय. आर. जरळीसर, मापटे सर, जावीर सर( प्राध्यापक), पचंडी मॅडम (तलाठी), संदीप दरदरे, संदीप भुरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. 

मला आजच्या युवकांना सांगावेसे वाटते की प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली असते, ती म्हणजे स्वतःचे ध्येय, त्यांनी निर्माण केले पाहीजे. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमची लक्ष्यप्राप्ती होत नाही. जागे व्हा, अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचे ध्येय पूर्ण करून आपल्या समाजासाठी काय  तरी करुन दाखवले पाहिजे. 
जय हिंद जय भारत

कमलेश जाधव, 8600680509

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News