नांदेडमध्ये चव्हाणांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची भाजपला मदत?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाला असे म्हटले जात होते. मात्र काँग्रेसचा आघाडीमधला मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपला मदत केली असल्याचे आता समोर येत आहे. नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे चव्हाणांचा पराभव करण्यासाठी भाजपला मदत केली असल्याची चर्चा होताना दिसते.

नांदेड : नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाला असे म्हटले जात होते. मात्र काँग्रेसचा आघाडीमधला मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपला मदत केली असल्याचे आता समोर येत आहे. नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे चव्हाणांचा पराभव करण्यासाठी भाजपला मदत केली असल्याची चर्चा होताना दिसते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कालच राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा आरोप केला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी नांदेडमध्ये हे चित्र पाहावयास मिळाले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाच पराभव झाला. ४०१४८ मताधिक्य घेत भाजपने नांदेडची जागा जिंकली. अशोक चव्हाण यांना स्थानिक गटातटाच्या राजकारणाचाही फटका बसला.

राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसला राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तर काँग्रेसने प्रत्येक ठिकाणी आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादीला मदत केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे ऐनविधानसभेपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं दिसतंय.

गोरठेकर यांची हकालपट्टी करा - माजी आमदार धोंडगे 
कंधार लोहा मतदारसंघाचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे केली आहे. मागील काही दिवसांपासून गोरठेकर हे भाजपच्या होर्डिंग्स आणि कार्यक्रमात दिसत आहेत अशी तक्ररीत म्हटले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News