मुंबई : सुधीर पुराणिक हे जमशेदजी नवरोजी पालीवाल कॉलेज, पाली इथे फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. १९९२ साला पासून एनएसएसची जोडलेले आहेत. पुराणिक यांचे लहानपण जळगाव जिल्ह्यात चाळीसगावात गेले.त्यांचे वडील चाळीसगावात प्रध्यापक होते. २००६ साली प्रोग्रॅम ऑफिसर म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. २००९ ला विद्यापीठाचा सर्वोत्कृट कार्यक्रम अधिकारी या पुरस्काराने गौरवण्यात आले.
एनएसएसच काम करत असताना सगळ्यांना एक सवय लागली, ती म्हणजे माणसाशी जोडून राहणे . या सवयीतून एनएसएसमध्ये मी पुढे सरकत गेलो. त्यावेळी आम्ही सर्व काम पेपरलेस करण्याचा प्रयत्न केला. एक्सेल शीट मध्ये ३८२ कॉलजचे रिपोर्ट गोळा करणे, हि एक मोठी बाबा होती.
एनएसएस मध्ये आपण सांगतो कि "झाडं लावा आणि जगवा" आणि दुसरीकडे आपणच पेपरसाठी झाडं तोडायची, हे थांबवण्याचा प्रयत्न होता.आज मुंबई विद्यापीठाच एनएसएसचं सगळं काम ऑनलाईन झालं आहे,आणि आवश्यक इतकेच कागद वापरले जातील याची काळजी घेतो. इस्माईल नावाचा अंध मुलगा होता. त्यावेळी मी आठवीला होतो आणि तो दहावीला होता, त्याला त्यावेळी परीक्षेला रायटर मिळत नव्हता,तेव्हा हे जाणवायला लागलं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो,आणि चेहरा नसलेला समाज जर तुम्हाला मदत करतोय तर आपण पण समाजाला देणं लागतो.
काही मुलांनां बघुन बाकीची मुलं पण पुढे येतात. या कोरोनाच्या महामारीच्या काळात काही मूलांनी स्वतःच किचन चालू केल. एक फूड हेल्पलाईन चालू केली होती. २१ एनजीओच्या ग्रुप बरोबर एनएसएसचे ८ स्वयंसेवक जोडलेले होते आणि त्यांनी ७५,००,००० लोकांना जेवण दिल. ठाण्याच्या स्वयंसिद्धी कॉलेजचा इम्रान शेखने रोज सकाळी ३,००० आणि संध्याकाळी ३,००० लोकांनां जेवण देत होता.
काही मुलांनी प्राण्यांसाठी हेल्पलाईन सुरु केली.कारण या काळात माणसांनाच खायला मिळत नव्हतं, तर प्राण्यांना कुठून मिळणार. या करता ती मुलं स्वतः पैसे काढून प्राण्यांना खायला घालत होते. ज्या बिल्डिंग मध्ये राहतात त्या मुलांनी बिल्डिंग स्वतः सॅनिटाईज केली. पालघरपासून ते बांद्या पर्यंत २७२ वाचनालय सुरु करून हि पूर्णपणे मोफत ठेवली.ठाण्याचे वेदांत कॉलेज रोज ३,००० लोकांना जेवण देत होते, त्यांच किचन सांभाळणं आणि प्याकिंग एनएसएसची मुलं करत होती. ३,००,००० मास्क वाटले.
आयुषमंत्रालयाने जेव्हा अर्सेनिक अल्बम औषध सुचवलं तेव्हा इम्युनिटी बुस्टर साठी मुलांनाही अर्सेनिक अल्बम सुधागड येथील वडी-वस्तीच्या घरांमध्ये दोन वेळा डोस वाटायला सुरुवात केली. याचा चांगला परिणाम असा जाणवला कि सुधागड गावात पहिल्या पाच महिन्यात कोरोनाची एकही केस झाली नव्हती .बऱ्याच कॉल्जेसनी ब्लड डोनेशन कॅम्प घेतले.
सर्वोत्कृट एकक पुरस्कार त्यांच्या कॉलेजला मिळाला. २०१४ ला सर्वोत्कृट जिल्हा समन्वयक हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. १५ एप्रिल २०१९ ला संचालक पदाचा कारभार सांभाळायला सुरुवात त्यांनी केली. यातून जातानाचे अनुभव प्रा.पुराणिक सरांनी यिनबझच्या टीमशी बोलताना सांगितले.