राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध जागांसाठी भरती
रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे रिक्त जागांसाठी जाहीरात काढण्यात आली.
गडचिरोली : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांचा अतिरिक्त भार डॉक्टरांना सहन करावा लागतो. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे रिक्त जागांसाठी जाहीरात काढली आहे. या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुप आहेत. त्याचा कालावधी तीन महिन्याचा असेल. कौशल्य चाचणी आणि मुलाखीद्वारे या जागा भरण्यात येतील.
पदाचे नाव आणि तपशील :
अनु. क्र पदांचे नाव पदे
१. सुक्ष्मजिव शास्त्र ०२
२. शारीर विकृती ०२
३. प्रयोगशाळा शास्त्रज्ञ ०२
४. प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०४
५. प्रयोशाळा सहाय्यक ०३
६. वार्ड बॅय/ परिचर ०३
शैक्षणिक पात्रता:
अनु. क्र.१ :
एम.डी मायक्रो बॉयलॉजी,
डिप्लोमा इन पॉथोलॉजी अॅड मायक्रोबॉयलॉजी
वय- ६२ पेक्षा अधिक नसावे
वेतन- ७५ हजार
अनु. क्र.२ :
एम.डी मायक्रो बॉयलॉजी किंवा
डी.सी.पी
वय- ६२ पेक्षा अधिक नसावे
वेतन- ७५ हजार
अनु. क्र.३ :
एम. एस्सी, पॉथोलॉजी
वेतन- ४५ हजार
वय- ३८ पेक्षा अधिक नसावे
अनु. क्र. ४ :
बी. एस्सी, पॉथोलॉजी
वय- ३८ पेक्षा अधिक नसावे
वेतन- १७ हजार
अनु. क्र. ५ :
बारावी विज्ञान उतीर्ण
वय- ३८ पेक्षा अधिक नसावे
वेतन- १५ हजार १००
अनु. क्र. ६ :
दहावी/ बारावी उतीर्ण
वय- ३८ पेक्षा अधिक नसावे
४०० रुपये प्रती दिवस
अर्ज करण्याची शेवची तारीख :
२० जुलै 2020
सायंकाळी ५ पर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
"जिल्हा शल्य चिकित्सक" सामान्य रुग्णालय, गडचिरोली (एनएतएम विभाग)
अर्ज कसा करावा:
उमेदवारांनी ए४ पानावर सर्व माहिती टाईप करुन अथवा खाली दिलेल्या नमुन्यात अर्ज भरुन नोंदणीकृत पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करावा. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो चिटकावून स्वत: साक्षांकीत करावी. विविध पदासाठी अर्ज करायचा असेल तर पदानुसार स्वतंत्र अर्ज करावा.
संपुर्ण जाहीरात/ अर्जाचा नमुना: https://drive.google.com/file/d/1a-5wxqRxKg7hnfupwQD8J-Kj--ELQNk8/view