झाडाखाली सामाजिक अंतर ठेऊन शाळा घेणाऱ्या शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर सामूदायिक वर्ग घेतले जातात. तसेच उत्तम भविष्याची शिक्षण हीच गुरूकिल्ली असल्याचे सुनिल कुमार यांचं म्हणणं आहे.

झाडाखाली सामाजिक अंतर ठेऊन शाळा घेणाऱ्या शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली -  राष्ट्रीय पुरस्कारांसाठीची यादी नुकतीच केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली, निवड झालेल्या यादीत जम्मू आणि काश्मीरमधील सुनील कुमार यांचा समावेश आहे. देशातील २८ राज्यांतील केंद्रशासित प्रदेश  प्रदेशातून १५३ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पद्धती देशात लॉकडाऊन असल्याने व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे जाहीर करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील उधमपुरचे शिक्षक सुनिल कुमार यांचे जाहीर केलेल्या यादीत आहे. सुनिल कुमार हे झाकर येथील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांचं शिक्षणाबद्दल असेललं प्रेम त्यातून दिसून आलं आहे. लॉकडाउन काळात सुनिलकुमार यांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांनी लॉकडाउनच्या काळातही शिक्षण सुरूचं ठेवले. विशेष म्हणजे त्यांनी लॉकडाउनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत झाडाखाली शाळा सुरू ठेवली होती. झाडाखाली शाळा घेत असल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक सुरू होतं.

प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर सामूदायिक वर्ग घेतले जातात. तसेच उत्तम भविष्याची शिक्षण हीच गुरूकिल्ली असल्याचे सुनिल कुमार यांचं म्हणणं आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील शिक्षण विभागाच्या संचालिका अनुराधा गुप्ता यांनी सुनिल कुमार यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अनुराधा गुप्ता यांनी ही माहिती आपल्या ट्विटरच्या अकाउंटवरून दिली. हा पुरस्कार जम्मू आणि काश्मीरमधील दोन शिक्षकांना जाहीर झाला असून त्यांची नावे सुनिल कुमार आणि रोहिनी सुलताना अशी आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताचं सुनिलकुमार यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News