नटराज थिएटर्स तरुणांच्या कला गुणांना व्यासपीठ देणारी संस्था

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

'नटराज थिएटर्स' ही मुंबई उपनगरातील अनेक होतकरू कलाकारांनी स्थापन केलेली एक सांस्कृतिक संस्था आहे. 
महिन्याभरातच शंभरहून जास्त युवक सहभागी झाले. संस्थेला कोणत्याही राजकीय पक्षाची साथ नसताना नटराज थिएटर्सने गेली ६ वर्षे कोणत्याही कलाकार आणि त्यांच्या पालकांकडून एकही रूपया घेतला नाही फक्त कलाकार घडवण्याचे काम केले. युवा दिननिमित्त 'नटराज थिएटर्स'चे तरुण संस्थापक अध्यक्ष पंकज चाळके, सचिव प्रतिक कांबळे, कलाकार अंकिता कुरकटे यांची उपसंपादक स्वप्नील भालेराव यांनी घेतलेली विशेष मुलाखत.

कोणता उद्देश ठेवून नटराज थिएटर्सची स्थापन झाली?
पंकज: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्रात सुवर्णसंधी प्राप्त व्हावी या हेतूने संस्थेचे स्थापन १९ नोव्हेंबर २०१३ मध्ये दादर येथील यशवंत नाट्यमंदिरात करण्यात आली. नटराज थिएटर्सने गेली ६ वर्षे विक्रोळीमध्ये कार्यरत आहे. नवोदित कलाकार आणि त्यांच्यातील कलेला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करत, बरेच कलाकार आहेत, कला सादर करता येते पण व्यासपीठ मिळत नाही म्हणून नटराज थिएटर्स त्यांना विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

 

नटराज थिएटर्स केव्हा पासून जोडले गेलात?
प्रतिक: मला लिहण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे मी लिहित गेलो. संस्थापक अध्यक्ष पंकज चाळके यांना माझे लिखाण आवडले, तरुण कलाकारांसाठी पंकज एक संस्था स्थापन आहे त्याचा सचिव म्हणून माझी निवड केली, असा प्रकारे मी संस्थेशी जोडला गेलो.

कोणत्या भुमिका साकारल्या?
अंकिता: मुंबई पोलीसांनी आयोजित पारितोषिके वितरण सोहळ्यात 'वर्दीतला देव माणूस' पथनाट्य सादर केले, त्यात प्रमुख भूमिका साकारली. त्यानंतर संविधान जपताय का? या पथनाट्यात देखील संविधानांची उद्देशिका म्हणून प्रमुख भूमिका साकारली आणि राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत सिंधूताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग केला.

पर्यंत पथनाट्य आणि नाटकाचे किती प्रयोग केले?
पंकज: नटराज थिएटर्सने आत्तापर्यंत ५५२ पथनाट्य, ३०० हून जास्त ठिकाणी सादर केले. १०० हून जास्त लघुनाट्य, ६६ एकपात्री अभिनय, २५ एकांकिका आणि इतर दोन अंकी नाटक, वगनाट्य सादर केले आहेत.

नटराजने सामाजिक कोणते काम केले?
प्रतीक: नटराज थियटर्सचे ब्रीदवाक्य || कला अस्माकम् धर्म:|| हे आहे. नटराज थियटर्स आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलीस दल, मुंबई पोलीस, मुंबई काँग्रेस युवा महोत्सव, मुंबई विद्यापीठ, मुंबई मध्यरेल्वे, आणि मुंबईतील जवळपास विस सामाजिक संस्थेमध्ये आपली कला सादर केली आहे. ८ मार्च २०१९ रोजी रोजी महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या "बेटी बचाओ,बेटी पढाओ" व "माझी कन्या भाग्यश्री" या योजनांच्या स्वागतासाठी पथनाट्य सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी नटराज थिएटर्सला लाभली. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई व "जमात-ए-इस्लाम-ए-हिंद" यांच्या संयुक्त विद्यमाने २४ मार्च २०१९ रोजी आयोजित केलेले जागतिक क्षयरोग दिनानिमित्त "टी.बी. मुक्त भारत" हे लघुनाट्य संपूर्ण मुंबईत जनजागृतीच्या उद्देशाने सादर केले होते.

तुझी सिंधूताई सपकाळ ही व्यक्तीरेखा खुप जागली? ही भुमिकेची प्रेरणा कुठुन मिळली?
अंकिता: ही प्रेरणा माझ्या आईकडून मिळाली, किती कष्ठ करण्याची तयारी, मेहमन पाहून मला नेहमी आईमध्ये सिंधूताई दिसायची. तीला पाहून भुमिका केली. जे काही यश संपादन केल आहे त्याच सर्व श्रेय आईला जाते. 

आजच्या तरुण वर्गाला काय सांगाल?
पंकज: आपली आवड व क्षमता पाहून करीअरची निवड तरुणांनी करावी, एक दिव्यांग मुलगी कलाकार होण्यासाठी आमच्या संस्थेत आली, तिला पाहून आश्चर्याचा धक्काचं बसला. तीने अथक परिश्राच्या जोरावर काही दिवसात उत्तम प्रकारे आपली कला सादर केली. मनात जिद्दी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News