नरेंद्र मोदींवर या कारणामुळे राहुल गांधींची शेलक्या शब्दात टीका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

कोणाचाही द्वेष न करता राजकारण करणे देखील महत्वाचे आहे अशा आशयाचा टोलादेखील मोदींना लगावला

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर  काँग्रेस पक्षाचे युवराज म्हणून ओळखले जाणारे राहुल गांधी हे दोघे सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात भलत्याच कारणावरून  चर्चेत आहेत. दोघांनाही एकमेकांवर सडकून टीका करताना आपण पहिले असेल मात्र यावेळेस राहुल गांधी यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे हे दोघे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सोशल मीडियाचा वापर हा अतिशय शीतापीने आणि योग्य वेळी विरोधकांवर अचूक असा निशाणा साधण्यासाठी केला आहे. आपल्या मोदी या नावाचं उत्तम असे ब्रॅण्डिंग देखील तेसुद्धा  २०१४ च्या निवडणुकीच्या काळापासून करत आले आहेत

मात्र आता ह्या सर्व सोशल मीडियाच्या चक्रव्युहातून संन्यास घेण्याचे सूतोवाच नुकतेच नरेंद्र मोदींनी केले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून नरेंद्र मोदींनी याबाबतचे ट्विट केले आहे. मोदींच्या नेमक्या ह्याच ट्विटला रिट्विट करत राहुल  गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे,

राहुल गांधी यांनी आपल्या या ट्विटमध्ये मोदींवर अत्यंत कठोर अशा अशा शब्दात टीका करत मोदींना द्वेष या शब्दापासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सोशल मीडियासुन दुरावण्यापेक्षा द्वेष या शब्दाला फाटा देण्याची विनंती राहुल गांधींनी नरेंद्र मोदी याना केली आहे. कोणाचाही द्वेष न करता राजकारण करणे देखील महत्वाचे आहे अशा आशयाचा टोलादेखील मोदींना लगावला यावर नरेंद्र मोदी यांनी मात्र भाष्य करण्याचे टाळले असून भविष्यात यावर त्यांची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News