नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयास मिळणार १३० कोटी, २० रुग्णवाहिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 July 2020
  • आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची घोषणा

नंदुरबार : 'सर्व सामान्य जनतेला अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. लवकरचं राज्य सरकारकडून १३० कोटी रुपये महाविद्यालयास देण्यात येतील, त्याचबरोबर २० रुग्णवाहिका आणि अत्याधुनिक साहित्य सामग्री उपलब्ध करुन देण्यात येईल', असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी जनतेला दिले. रविवारी शहादा तालुक्यातील राणीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. पाडवी यांनी यावेळी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. 

'ग्रामीण भागातली जनतेला तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 'प्राथमिक आरोग्य केंद्र' सुरु करण्यात आले. कलांतराने प्रथमिक आरोग्य केंद्राचे जिल्हा उप रुग्णालय करण्यात येईल. आरोग्य केंद्रासाठी लागणारे डॉक्टर, कर्मचारी, वैद्यकीय साहित्य, पायाभूत सुविधा काही दिवसात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे. दुर्गम भागातील मुलभुत समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. जनतेनी एकत्र येऊन शासनाला सहकार्य करावे' असे आवाहन पाडवी यांनी नागरिकांना केले. 

उद्घाटन प्रसंगी खासदार डॉक्टर हीना गावीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एन. बोडके, सीईओ विनय गौडा, सब सीईओ शेखर रौदळ, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा शाळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रधुवंशी, सभापती जयश्रीताई पाटील, प.स. सभापती अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाडवी यांनी आरोग्य केंद्रात वृक्षारोपन केले आणि आरोग्य सुविधांची माहिती घेतली. ग्रामीण भागात डॉक्टरांनी पुरवलेल्या सेवेबद्दल कौतुक केले. डॉ. हीना गावीत, सीमा शाळवी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News