'गर्लफ्रेंड'ला नग्नावस्थेत केला व्हिडिओ कॉल, मग झालं असं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020

'गर्लफ्रेंड'ला नग्नावस्थेत केला व्हिडिओ कॉल, मग झालं असं...

'गर्लफ्रेंड'ला नग्नावस्थेत केला व्हिडिओ कॉल, मग झालं असं...

बेंगळुरू - सोशल मीडियाच्या माध्यामातून एका तरूणाची एका तरूणीशी ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं...दोघेही प्रेमात इतके आकंड बुडाले की, प्रियकर तिच्यासाठी पाहिजे करायला तयार झाला. त्याच्या 'गर्लफ्रेंड'ने व्हाट्सअप्पवरती नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. प्रियकर तयार झाला आणि त्याने नग्नावस्थेत अवस्थेत व्हिडिओ कॉल केला. 

त्यानंतर प्रियकराला हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून मी सोशल मिडीयावर शेअर करणार अशी प्रेयसीने धमकी दिली. घाबरलेल्या प्रियकराने प्रेयसीकडे गयावया केली. पण सोशल मीडियावर ओळख झालेली तरूणीने त्याच्याकडे थेट पैशाची मागणी केली. तिने त्यांच्याकडे तब्बल ५० हजार रूपयांची मागणी केली. पण इतके पैसे नसल्याने तो तरूण पुन्हा गयावया करायला लागला. घाबरलेल्या तरूणाने स्वत: कडचे २२ हजार रूपये पाठवले. त्यानंतर प्रेयसी आणखी पैशांसाठी तरूणाच्या पाठी लागली. त्यानंतर मात्र घाबरलेल्या तरूणाने थेट पोलिस स्टेशन गाठले. 

पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी फसवणूक झालेले सर्व नंबर घेतले आहेत. त्याचपध्दतीने फसवणूक केलेल्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. हा तरूण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याची एका मुलीशी व्हाट्सअप्पवरती ओळख झाली. हा तिच्या प्रेमात आकंड बुडाला होता. तरूणाने तिच्या सांगण्यावरून नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल केला. तरूणीने तिचं निशा नाव असं तरूणाला सांगितलं होत. तसेच तरूणी केरळात राहत असून कॉल सेंटरमध्ये काम करत आहे, अशी माहिती तरूणाला सांगितली होती. 

तरूण एका भाड्याच्या खोलीत राहत असून त्याला एक दिवस कॉल आला. 'हॉट टॉपिक'वर चॅटिंग करू असं त्याला समोरून निशा नावाच्या मुलीनं सांगितलं. त्यानंतर दोघात दिवस-रात्र गप्पा होऊ लागल्या. त्यानंतर निशानं तुला नग्नावस्थेत पाहायचंय असं सांगितलं, पण तरूण सुरूवातीला तयार नव्हता. पण तू जर नग्न झालास तर मी सुध्दा नग्न होईन असं निशानं त्याला सांगितले. त्यानंतर तरूणाने धाडसाने व्हिडीओ कॉल केला आणि त्यांच्या जाळ्यात अडकला. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News