नागपुरात PUBG ने केलं, तरुणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त, थेट डोळ्यांसह आणि मेंदूवरही झाला परिणाम...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे भौतिक विकास होत असताना नव्या पिढीचे आयुष्य कोठे चालले आहे, याचे उदाहरण येथे पाहावयास मिळाले.

उमरेड - प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे भौतिक विकास होत असताना नव्या पिढीचे आयुष्य कोठे चालले आहे, याचे उदाहरण येथे पाहावयास मिळाले. उमरेड येथील एक आयटीआयमध्ये शिकणारा तरुण ‘पबजी’ गेमच्या विळख्यात सापडून त्याच्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. त्याच्या डोळ्यांना व मेंदूला गंभीर विकार जडला आहे. तज्ज्ञांच्या मते त्याला ‘सायकोसिस’ हा मानसिक आजार जडला आहे.

उमरेडचा रहिवासी असलेला हा तरुण आयटीआयचा विद्यार्थी आहे. त्याच्यासोबत पाच-सहा मित्रांचा एक समूह आहे. त्यांनाही कित्येक दिवसांपासून ‘पबजी’चे व्यसन जडले आहे. या तरुणाला दिवसाला पाच ते सहा तास सतत गेम खेळण्याचे व्यसन लागले. त्यामुळे रविवारी त्याचे डोळे जळजळ करू लागले आणि अचानक ते बंद झाले. ते उघडत नसल्यामुळे पालकांनी स्थानिक नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप बाकडे यांच्याकडे उपचारासाठी त्याला दाखल केले. तेव्हा डॉक्‍टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितले. त्याचे सिटी स्कॅन झाल्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. 

हृतिकचा आजार हा डोळ्यांशी संबंधित नसून,  तो ‘न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम’ आहे. ‘न्यूरोलॉजिकल पॅरेलिसिस’सुद्धा असू शकतो. तेव्हा मी त्यांना न्यूरोलॉजिकल तज्ज्ञांकडे ‘रेफर’ करण्यास सांगितले.

- डॉ. प्रदीप बाकडे, नेत्ररोग तज्ज्ञ

हा आजार गेमशी संबंधित नसून त्याला ‘आयटीआय’ची ३० हजार रुपये फी भरायची होती. त्यावरून थोडे भांडण झाले आणि त्याच्या डोक्‍यावर परिणाम झाला. तो आता लवकर बरा होईल, असे डॉक्‍टर म्हणतात.

- मुलाची आई

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News