ठरल! 'या' तारखेपासून सुरु होणार नागपूर विद्यापीठाची परीक्षा; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सुचना

निखिल ठाकरे
Saturday, 12 September 2020

राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन एमसीक्यू परीक्षा घेण्याचा अंतिम निर्णय घेतला. 

वर्धा : देशात दिवसेंदिवस कोविड19 विषाणूचा संसर्गा वाढत आहे. अशा परिस्थिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात की नाही असा प्रश्न पालक- विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता. याबाबत अनेक निर्णय घेण्यात आले. परीक्षा घेण्याचे सर्वस्वी अधिकार विद्यापीठ अनुदान आयोगाला आहे. त्यामुळे युजीसीने अंतिम निर्णय घ्यावा अशा सुचना सर्वोच्च न्यायालयाने याचिका कर्त्यांना दिल्या. परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पास करता येणार नाही, त्यामुळे विद्यापीठांनी परीक्षांचे आयोजन करावे असे आदेश युजीसीने विद्यापीठांना दिला. आणि परीक्षा घेण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यामुळे राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन एमसीक्यू परीक्षा घेण्याचा अंतिम निर्णय घेतला. 

कशी होणार परीक्षा?

  • २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांची सराव एमसीक्यू टेस्ट घेतली जाणार आहे
  • अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे
  • ही परीक्षा केवळ 1 तासाची असेल, 25 प्रश्न विचारले जातील. 
  • परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित असून अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत 
  • बॉकलॉक विद्यार्थ्यांची (उदा. सेमिस्टर-3, सेनिस्टर- 4 आणि सेमिस्टर- 5) सुध्दा महाविद्यालय स्थरावर ऑनलाईन परीक्षा होणार आहे.
  • बॉकलॉक विषय राहिले आहेत त्यांची परीक्षा 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान महाविद्यालय पातळीवर होणार आहे. 

परीक्षेसाठी हे करा?

परीक्षा कालावधीत विद्यार्थी मोबाईल फोन जवळ बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपला अद्यावत मोबाईल नंबर महाविद्यालयात नोंदवावा. त्यानंतर महाविद्यालय विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर विद्यापीठाला कळवेल. विद्यार्थ्यांच्या मोबाईल नंबरवर विद्यापीठकडून एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी अँप डाउनलोड करायचा आहे. याकरिता अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात संपर्क करावा. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News