स्वयं अध्यायन करुन बारावीच्या परीक्षेत नाभिकाच्या मुलीने मिळवले ९९. ५ टक्के गुण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

घरची परिस्थिती अतिषय नाजूक असल्यामुळे जसप्रीत कौरला कोचिंग क्लासेस लावने शक्य झाले नाही. जसप्रीतने घरीत स्वयं अध्यायन करुन परीक्षा दिली आणि नैत्रदीप यश संपादन केले.

अनसा : मनात जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करण्याची इच्छाशक्ती असेल तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हे जसप्रीत कौर या १८ वर्षीय तरुणीने सिद्ध करुन दाखवले. कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन जसप्रीतने पंजाब राज्य बोर्डाच्या बारावी परीक्षेत ९९. ५ टक्के मार्क मिळवले आहे. तरुणीने मिळलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून सुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

कोरोनामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पंजाब राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाला अखेर बुधवारी (ता.२२) जाहीर झाला. जसप्रीत कौर या विद्यार्थिनीला ४५० पैकी ४४८ गुण मिळाले. जसप्रीतचे वडील बलदेव सिंग कौर केस कापण्याचे काम करतात. त्यांना दररोज सरासरी दोनशे रुपये मजूरी मिळते. तर आई गृहिनी आहे. कठीन परिस्थिती कुटुंबाचा गाडा चावलत बलदेवने आपल्या मुलीला शिक्षण दिले. वडीलाने घेतलेल्या कष्ठाचे मुलीने चिज करुन दाखले. त्यामुळे जसप्रीतचे गावात कौतुकाने नाव घेतले जात आहे. 'रात्रीचा दिवस करुन मुलीने अभ्यास केला आणि कुटुंबासह गावाचे नाव रोशन केले' असे गावातील मंडळी बलदेवस सिंग यांच्याकडे मत व्यक्त करत आहेत. पंजाब राज्यातील मनसा जिल्ह्यात बलदेव सिंग कौर यांचा परिवार स्थाईक आहे.    

घरची परिस्थिती अतिषय नाजूक असल्यामुळे जसप्रीत कौरला कोचिंग क्लासेस लावने शक्य झाले नाही. जसप्रीतने घरीत स्वयं अध्यायन करुन परीक्षा दिली आणि नैत्रदीप यश संपादन केले. जसप्रीतला इंग्रजी विषयात एम. फील करायच आहे. 'घरची परिस्थिती प्रतिकुल असल्यामुळे अर्धवेळ काम करुन पुढील शिक्षण पुर्ण करणार आहे' असे जसप्रीतने सांगितले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News