रहस्य यशाचे

लक्ष्मण जगताप, बारामती
Thursday, 6 June 2019

आपले ध्येय, मनाशी बाळगलेले स्वप्न साध्य करण्यासाठी असणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकाटी. अविरत प्रयत्नांचे सातत्य. प्रत्येक श्वासागणिक घेतलेला ध्यास.
 

आपले ध्येय, मनाशी बाळगलेले स्वप्न साध्य करण्यासाठी असणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकाटी. अविरत प्रयत्नांचे सातत्य. प्रत्येक श्वासागणिक घेतलेला ध्यास.

ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत. मनात हवी जिद्द. प्रयत्न करुनही अपयश आल्यावर आपण हतबल होतो. नाराज होतो. आपला उत्साह ओसरतो आणि प्रयत्न करणे सोडून देण्याचा विचार मनात येतो. पण हीच वेळ असते हतबल न होता पुन्हा नव्याने डाव मांडण्याची. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची. पाषाणालाही भेदण्याची ताकद असते, पाण्याच्या संततधारेत, ती केवळ चिकाटी मुळेच. विजेच्या दिव्याचा शोध लावताना थाँमस अल्वा एडिसन नऊशे नव्व्यानऊ वेळा प्रयत्न करुनही अपयशी ठरला. पण हजाराव्या वेळी विजेचा दिवा शोधण्यात तो यशस्वी ठरला केवळ चिकाटीमुळेच.

यश मिळविण्यासाठी हवी चिकाटी. टंगळमंगळ,टोलवाटोलवी, चालढकल, बघू, करु म्हणजे चिकाटीपासून दूर जाणे. यशाचा मार्ग खडतर करणे. ठरलेल्या ध्येयापासून दूर पळणे. एकदा का ध्येय ठरले की मागे पाहायचे नाही. धावणारे पाणी वाटेत येणाऱ्या सर्व संकटातून मार्ग काढत पुढे पुढेच जात असते. पाण्याचा हा गुण आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती. चिकाटीने प्रयत्न करणारा यशाचा मानकरी ठरतो. त्यासाठी त्याने उपसलेले कष्ट. ध्येयाचा घेतलेला ध्यास. यशाला गवसणी घालण्याची त्याच्या मनगटात असणारी धमक. ही त्याला उपयोगी पडलेली असते ती त्याच्या अंगी असणाऱ्या चिकाटीमुळेच.

आपण हाती घेतलेल्या कामात अथवा ठरविलेल्या ध्येयात अपयश येईल. त्यावेळी झालेल्या चुका शोधू. त्या पुन्हा न होण्याची खबरदारी घेऊ. शांतपणे चिकाटी न सोडता. नव्या उमेदीने ध्येयाकडे वाटचाल करु. सळसळत्या उत्साहाने आणि चिकाटीने प्रयत्न करु. आणि मगच यशाची चव चाखूया...त्यासाठी हवी आधी मनात चिकाटी.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News