सात जन्मगाठींचे रहस्य! जाणून घ्या...

सुधाकर नाटू
Thursday, 9 May 2019

कोनत्या स्त्रीचे कुणाशी लग्न व्हावे हे खरोखर गुढ व अनाकलनीय कोडे! कुणाचा प्रेमविवाह होऊनही, नंतर बेबनाव होतो, तर कुणाचे एकमेकांना न बघताही, परस्पर ठरविलेले विवाह कमालीचे यशस्वी होतात.

मानवी जीवनात विवाहाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्म मृत्यू या दोन गोष्टी जशा माणसाच्या हातात नसतात, तद्वतच जीवनाला नवीन कलाटणी दिशा देणारी, विवाह जुळणी सारखी महत्वपूर्ण घटना, ही माणसाच्या हातात नसावी असे वाटण्याजोगे अनुभव येतच असतात.

कुणा स्त्रीचे कुणाशी लग्न व्हावे हे खरोखर गुढ व अनाकलनीय कोडे! कुणाचा प्रेमविवाह होऊनही, नंतर बेबनाव होतो, तर कुणाचे एकमेकांना न बघताही, परस्पर ठरविलेले विवाह कमालीचे यशस्वी होतात.

ही जन्मगाठ जणू सात जन्मांसाठी कुणीतरी अज्ञात शक्ती बांधत असावी असे वाटण्याजोगे क्षणही येत राहतात. कळपाने राहणाऱ्या मानव समाजात जेव्हा तेव्हा विवाहाच्या बंधनाची सुरुवात झाली, तो क्षण मानवी इतिहासात क्रांतिकारक मानावा लागेल. त्यामुळेच मानवी जीवनाला स्थैर्य आले, एक योग्य ती सामाजिक संस्कृती अशी दिशा लाभली.

पुष्कळदा विवाह जुळविताना घाई होते, अनेक महत्वाच्या गोष्टीकडे अनवधानाने दुर्लक्ष होऊन जातं. नंतर आपली फसगत झाली असे ध्यानात येते. पण दुर्दैवाने वेळ निघून गेलेली असते. दोन्ही बाजूंना विन/विन असा अनुभव अपवादानेच येतो. असे माझे निरीक्षण आहे.

"जन्मगाठ ही जणू ब्रह्मदेवच बांधतो" असे समजून ज्याला त्याला समाधान मानावे लागते!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News