माझी शाळा  

गणेश लोंढे
Tuesday, 1 October 2019

चांदोबा मामा आले वर्गात 
हातात घेऊन छडी 
गप्प बसा मुंलानो 
आता उघडा पुस्तकाची घडी 

ढगावरती भरली 
चांदण्याची शाळा,
सुटबुट घालून ऐटीत 
सर्वजण झाली गोळा

चांदोबा मामा आले वर्गात 
हातात घेऊन छडी, 
गप्प बसा मुंलानो 
आता उघडा पुस्तकाची घडी 

केले तुम्ही मुंलानो 
मराठीचे प्रश्न उत्तरे पाठ, 
नाही तर खावा लागेल 
हातावरती छड्या आठ 

घंटा वाजला 
सुटली शाळा, 
घराकडे मुलांनो 
धावत पळा... 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News