माझी आई

हनुमंत बालाजी चव्हाण
Wednesday, 31 July 2019

या हवहवीच्या 
अन् धनदौलतीच्या दुनियेत
सोन्या चांदीला लात मारून
मलाच सोनं समजते माझी आई

ताजे मजला भरवूनि 
शिळे खाते माझी आई
स्वत: ओंजळीतून 
झिरपणारे पाणी पिते
पण मजला मात्र
साडीच्या पदरातून 
गाळून पाजते माझी आई

या हवहवीच्या 
अन् धनदौलतीच्या दुनियेत
सोन्या चांदीला लात मारून
मलाच सोनं समजते माझी आई

माझ्या बाबांनी नाही
तोडले चांद तारे तिच्यासाठी
नाही बांधला ताजमहाल
पण आहे त्या झोपडीत
आनंदाने राहते माझी आई

उठता रोज सकाळी
देवाकडे ती स्वत: साठी
काहीच मागत नाही
माझ्याच उज्वल  भवितव्याची 
सतत प्रार्थना करते माझी आई

अजून कसलं सुख
अन् कसली माया 
हवीय 'हनुमंता'
ठेव नेहमी आईच्या
चेहऱ्यावर कोमल हास्य
हीच तुझी महानता

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News