माझे आजोळ

सौ. प्राजक्ता श्रीकांत चव्हाण (अहमदाबाद )
Tuesday, 24 September 2019

आजोळ म्हणजे ...
भावंडांबरोबर खूप सारी मस्ती 
सुग्रास जेवून आलेली सुस्ती 

माझे आजोळ म्हणजे ...
आजी- आजोबांची छत्र छाया 
मामा- मामींची आभाळमाया 

आजोळ म्हणजे ...
दिवसभर कॅरम अन् मध्यरात्री रांगणारे पत्त्याचे डाव 
आणि स्वयंपाक घरातून येणारे  खमंग सुवास 

आजोळ म्हणजे ...
भावंडांबरोबर खूप सारी मस्ती 
सुग्रास जेवून आलेली सुस्ती 

आजोळ म्हणजे ...
चैतन्य नावाचे  उंबदार घरटे 
तुलना केली तर आकाश ठेंगणे 

आजोळ म्हणजे ...
प्रेम,जिव्हाळा, आपुलकीची नाती 
शब्द पडी अपुरे वर्णन कराया त्यांची  महती

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News