माय मराठीने जीवन जगायला शिकवलं...

शिल्पा नरवडे
Thursday, 27 February 2020

मराठी भाषा ही वेगवेगळ्या भागांमध्ये नवी लय धारण करते पण मूळचा गाभा मात्र तोच संत ज्ञानेश्वर माऊलींनी छातीठोकपणे सांगितल्याप्रमाणे अमृताशी पैजा जिकणारा गोड पवित्र आणि रसरशीत अशा मायबोली मराठीस करावे

जागतिक मराठी भाषा हा दिवस जगभरातील सर्वच मराठी बोलणाऱ्या व्यक्तींकडून दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रख्यात कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज हा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने पुढाकार घेऊन कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेला योगदानाला सलाम करत या दिवसाला मराठी राज्यभाषा दिनाची मान्यता देण्यात आली. खरं तर आपण ज्या गोष्टींवर प्रेम करतो किंवा जी आपली आई आहे तिच्यासाठी काही खास दिवस वैगरे असावे हे तसे दुबळेपणाचेच लक्षण आहे, तरीसुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांनी गौरविलेल्या अमृतासोबत पैजा जिकणाऱ्या पण तरीसुद्धा आपल्याच मुलाकडून उपेक्षित झालेल्या माझिया मराठीची महत्ता तिच्याच लेकरांना समजवण्याठी तिचा दिन असावा पण उपेक्षितांच्या गर्दीमध्ये ती दिन न व्हावी हीच अपेक्षा आहे मायमराठी ही आपली आई आहे तिने आपल्याला आगाखांद्यावर खेळवत मोठ केलं एका आईने जीवन दिल असलं तरी या माय मराठीने जीवन जगायला शिकवलं तीच्या माध्यमातून आपण जन्मदात्या आईशी पहिला सवांद साधला आहे या माय मराठीला आपण जन्मदात्या आईच्या गर्भात असल्यापासूनच शिकत असतो तिने आपल्यावर प्रेम केलं जगाच्या इतिहासात ती खूप समृद्ध आहे.

अस म्हणतात ना पिकते तिथे विकत नाही किंवा त्या गोष्टीची किंमत नसते अगदी तशीच गत आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचे महत्व तितके जाणवत नाही म्हणजेच आई समोर असताना आईचे महत्व जाणवते का?

आपण जेव्हा परप्रातांमध्ये  काही काळासाठी जातो आणि जेव्हा ती परप्रांतीय भाषा सतत आपल्या कानावर पडू लागते तेव्हा आपण आपली भाषा ऐकण्यासाठी जीव कासावीस होतो चुकून जर आपली भाषा बोलणारी अनोळखी माणसे दिसली किंवा भेटली तर ती माणसे अनोळखी असून सुद्धा आपलीशी वाटतात हेच तर आहेत मराठी भाषेचे अदृश्य धागे...

आज मराठी ज्या रुपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले शासकीय कामकाज आणि बोलीभाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला जसजसा मराठी साम्राज्याचा विस्तार होत गेला तसाच मराठी भाषेचाही विस्तार होत गेला 
मराठी भाषा ही वेगवेगळ्या भागांमध्ये नवी लय धारण करते पण मूळचा गाभा मात्र तोच संत ज्ञानेश्वर माऊलींनी छातीठोकपणे सांगितल्याप्रमाणे अमृताशी पैजा जिकणारा गोड पवित्र आणि रसरशीत अशा मायबोली मराठीस करावे सर्वांनी कोटी कोटी प्रणाम...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News