माझा विरंगुळा

स्वाती रोडगे
Thursday, 12 September 2019

करावे मन मोकळे हलका करूनी भार सगळा..
असा तो प्रिय सखा, विरंगुळा...

कधीतरी वाटते घेऊन स्वतःला, न्यावे कुठंतरी दूर
या पिंजारलेल्या गर्दीतून करावा
काही क्षणांचा मार्ग मोकळा
आणि, याच क्षणी भेटावा मला तो
माझा विरंगुळा...

सर्वांबरोबर मनसोक्त मौजमजा करतांना
स्वैर भ्रमात भरकटलेला, 
स्वत्व हरवलेल्या गर्दीमध्ये एकाकी सोडून पिसाळलेला जीव माझा
पण नकळत, एकांतात स्वतःमध्ये भेटलेला, 
हात धरून चार क्षणांची भरभरून सोबत केलेला विरंगुळा...

या भकास भासणाऱ्या स्वार्थी जगात
वाटलीच कसली भिती कुणाजवळ काही बोलण्याची
अशातच मग असावी सोबत ज्याची
करावे मन मोकळे हलका करूनी भार सगळा..
असा तो प्रिय सखा, विरंगुळा....

सरून जातील दिवस, विरून जातील आठवणी
पण कायमच शेवटपर्यंत सांभाळून घेईल तोचं

जगण्याच्या वाटेत लागलेला ज्याचा लळा
एक एकट्या प्रितीचा हा छंदच निराळा
तोच माझा जीवलग विरंगुळा...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News