माझी आवडती "खिचडी"

बी. सोनावणे
Friday, 23 August 2019

खुलायचा तो मनाचा कप्पा
सुंगध जणू बिर्याणी पुलाव,
शिजलेला तो रटरट उकळा
पहात्या क्षणी हृदयी फुलाव...!!

अश्रू वाहतात हे खळखळा
जेव्हा आठवण बालपणीची,
आई बनवायची ती "खिचडी"
जाणीव होती आम्हां गरीबीची...!!

अर्थच काय जगण्याला
रेशनचे असायचे तांदूळ,
मीठ मसाला तेलाविना
बनविण्याची ती धांदळ...!!

खुलायचा तो मनाचा कप्पा
सुंगध जणू बिर्याणी पुलाव,
शिजलेला तो रटरट उकळा
पहात्या क्षणी हृदयी फुलाव...!!

हेची जीवनाचा अर्थ शिकवेत
लज्जतच त्या "खिचडीची" न्यारी,
अजूनी ती चव जीभेवर रेंगाळते
आई खरच बनवाचीच हो भारी...!!

शब्द कमी पडतील अशी होती
त्या मायेने बनवलेली "खिचडी",
असेल नसेल त्यात समाधानी
हल्लीची तर अजबच "दालखिचडी"...!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News