शहाणपणा शिकवणाऱ्यांनी बंगले न सोडल्याने अजून माझ्या भावाला बंगला नाही - सुप्रिया सुळे

यिनबझ टीम
Sunday, 8 March 2020

महाविकास आघाडीचे सरकार येऊन आज 100 दिवस पुर्ण झाले तरी मात्र माझ्या भावाला शासकीय बंगला मिळेना, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी एका मेळाव्यात बोलून दाखवली.

महाविकास आघाडीचे सरकार येऊन आज 100 दिवस पुर्ण झाले तरी मात्र माझ्या भावाला शासकीय बंगला मिळेना, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी एका मेळाव्यात बोलून दाखवली.

रोहा येथे राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हा मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर सडकून टिका केली आहे. गेल्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी शासकीय बंगल्यांवरचा ताबा न सोडल्याने आत्ताच्या सरकारमधल्या अनेक नेत्यांना मुंबईत राहाण्यासाठी अजून शासकीय बंगले मिळाले नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

महाविकास आघाडीचे सरकार येऊन अद्याप 100 दिवस झाले, तरी नव सरकारातील काही मंत्र्यांना शासकीय बंगले मिळाले नाहीत. एरवी नव्या सरकारला तत्वज्ञान शिकवणाऱ्या अनेक नेत्यांनी सरकार जाऊनही अजून शासकीय बंगल्यांचा ताबा न सोडल्याने अजित पवारांना चर्चगेटच्या एका घरात राहाण्याची वेळ आली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला राहाण्यासाठी देण्यात आला होता, मात्र सरकार गेल्यानंतरही अजून त्यांनी बंगल्याचा ताबा न सोडल्याने अजित पवारांना राहाण्यासाठी  शासकीय व्यवस्था होत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News