'अवनी'ला बोलताच येत नाही...

सुरज पाटील (यिनबझ)
Friday, 3 May 2019

अशीच सहज भेटलेली
एका कामाच्या ठिकाणी

 

अशीच सहज भेटलेली
एका कामाच्या ठिकाणी
पहिला कधीच ओळख नसणारी ती
लांब असली तरी, आता सोबत असते माझ्या...
मात्र, प्रश्न इतकाच की, तिला बोलता येत नाही

तस बोलणं होतच असतं आमचं रोज
पण काय करणार, त्यात भांडणंच असतात
तिला वाटतं की,
भांडल्याने नातं घट्ट होतं...
इथे नातं तुटायलची वेळ आली
पण जुळायचं नाव घेत नाही...
कारण इतकच की, तिला बोलता येत नाही
 
भांडण जास्त वेळा माझ्याकडूनच असतं
नरमाईही तशी मीच घेत असतो
कधी ती समजून सांगते, पण कधी शांत बसते
कारण इतकच की, तिला बोलता येत नाही...

ती पाहाते स्वप्न माझ्यासोबत आयुष्याची
तसा मीही असतोच तिच्या स्वप्नांमध्ये
पण त्या आयुष्यभराच्या स्वप्नांमध्ये
समजूतदारपणा कसा टिकेल, माहित नाही
कारण  इतकच की, तिला बोलता येत नाही...

ती असते नर्व्हस, नाराज, दुःखी रोजच
पण बोलताना सदा हसलेली असते
वेगवेगळ्या विचारांनी नेहमी ग्रासलेली असते
कारण इतकच की, तिला बोलता येत नाही...

आता म्हणतो मीच बोलावं तिच्या घरच्यांशी थेट
घ्यावं जाणून एकदा तरी तीच तुंबलेलं आयुष्य
मात्र काय सांगेल ती स्वतः, आमच्याबद्दल घरच्यांना
कारण इतकच की, तिला बोलता येत नाही...

म्हटलं आता शांतच आपण बसायचं
तिच्या बोलण्याची वाट बघायचं
कॉलच्या बदली कॉल आणि मॅसेजला रिप्लाय द्यायचं
माझं सगळं काही ठरलं, तरीही काही होत नाही
कारण इतकच की, तिला बोलता येत नाही...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News