असा एक भारतीय मुस्लीम खेळाडू जो मंदीरात जातो आणि पुजाही करतो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

एका मुस्लीम खेळाडूने हिंदू देवाचे दर्शन घेणे ही आज घडीला खुप मोठी गोष्ट आहेत.

धर्माच्या नावावर जातीय दंगली वनव्यासारख्या पेट घेत आहेत. यामध्ये अनेक निरपराध लोकांचे बळी जात आहे. धर्मासाठी माणूस नसून, मानसांसाठी धर्म आहे. या मानवी मुल्यांची रुजणूक करण्याचे काम समजातील काही तरुण मंडळी करत आहेत.

मोठी बातमी: MPSC परीक्षेसाठी तरुणांनी घातले चक्क छत्रपतींना साकडे 

भारताचा माजी बेगवान गोलंदाज जहीर खानने सहकुटुंब हिंदू मंदिरात जाऊन काही दिवसापुर्वी देवाची पुजा केली आणि आशिर्वाद घेतला. एका मुस्लीम खेळाडूने हिंदू देवाचे दर्शन घेणे ही आज घडीला खुप मोठी गोष्ट आहेत. यातून हिंदू- मुस्लीम ऐक्याची संदेश जगभर जात आहे. चंदेरी दुनियेतील अऩेक कलाकार मस्जित, मंदीर, दर्जा अशा पवित्र ठिकाणी जावून दर्शन घेतात.

माजी वेगवान गोलंदाज जहीर खान यांच्या नावावर अऩेक विश्व रेकॉर्ड आहेत. त्यांनी 92 कसोटी सामन्यात 311 विकेट घेण्याचा वि्क्रम केला होता. टी 20च्या 17 समान्यात 17 विकेट घेऊन निवृत्ती घेतली.

 

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना धर्म स्वतंत्र दिले आहे. नागरिकांनी कोणत्या धर्माचे पालन करावे आणि कोणता धर्म स्विकार करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, शासनाचा कोणताही धर्म  नाही, सरकार धर्मनिरपेक्ष काम करेल असे भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News