बालनाट्य स्पर्धेत संगीत वात्सल्य नाटकाची बाजी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

१७ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाशिक येथील कृपा शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या ‘संगीत वात्सल्य’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले.

नाशिक :  सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या १७ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाशिक येथील कृपा शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या ‘संगीत वात्सल्य’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. या नाटकाने दिग्दर्शन, प्रकाश योजना, रंगभूषा, लेखन, संगीत, वेशभूषा, उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व अभिनयाचे गुणवत्तापदक अशी एकूण आठ पारितोषिके पटकावत बालनाट्यातील नाशिकचा दबदबा सिद्ध केला. सेक्रेड हार्ट स्कूल, एस. एस. सी. वरप, कल्याण या संस्थेच्या ‘बदला’ या नाटकाला द्वितीय, तर व्यक्ती, पुणे या संस्थेच्या ‘पट्टेरी’ या नाटकास तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. 

लातूर येथील (कै.) दगडोजीराव देशमुख नाट्यगृह येथे स्पर्धेची अंतिम फेरी झाली. परीक्षक म्हणून अरुंधती भालेराव, वीणा लोकूर, शंकर घोरपडे, प्रकाश पारखी, एकनाथ आव्हाड यांनी काम पाहिले. इतर पारितोषिके अशी (कंसात नाटकाचे नाव) : दिग्दर्शन : प्रथम- कार्तिकेय पाटील (संगीत वात्सल्य), द्वितीय- सुरेश शेलार (बदला), तृतीय- हर्षद ससाणे (थेंबाचे टपाल), प्रकाश योजना ः प्रथम- चेतन ढवळे (संगीत वात्सल्य), द्वितीय- श्‍याम चव्हाण (द गेम). नेपथ्य ः प्रथम- बबन कुंभार (द गेम), द्वितीय- अशोक घोलप (प्रायश्‍चित). रंगभूषा : प्रथम- विजय शिरगावकर (द गेम), द्वितीय- पूनम पाटील (संगीत वात्सल्य). नाट्यलेखन : प्रथम- सुरेश शेलार (बदला), द्वितीय- नितिन गरुड (संगीत वात्सल्य). संगीत दिग्दर्शन ः प्रथम- वैभव काळे (संगीत वात्सल्य), द्वितीय- मनीषा पंडित (वारी). वेशभूषा : प्रथम- सई कुलकर्णी (संगीत वात्सल्य), द्वितीय- महादेव पाटील (द गेम). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ः स्वयंम शिंदे (वानरायण), कृष्णा राजपूत (आम्हाला पण शाळा पाहिजे), साहिल जाधव (पट्टेरी), शाश्‍वत उल्हे (खेळण्यातील गेम), इशान जबडे (इन्व्हिजिबल एनिमी), पयोष्णी ठाकूर (थेंबाचे टपाल), यशश्री मुळे (एका वाघिणीची गोष्ट), श्राविका जाधव (आम्ही सावित्रीच्या लेकी), भूमिका घोरपडे (अ..आ..आकलन), दुर्वाक्षी पाटील (संगीत वात्सल्य). 

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : स्नेहा तराळ, तन्वी खाडीलकर, अनुश्री काळे, सांची कांबळे, वैभव दातार, जय पवार, सत्यजित शिरोळे, तन्मय देशपांडे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News