मुशाफिरी भाग ८

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 April 2020
राजीव गांधी यांच्या पंतप्रधान काळात या पुलाला मान्यता मिळाली. तो पुढे १०-१२ वर्षांच्या काळा नंतर तयार झाला. अरुणाचलला व आसाम मध्ये जाण्यास दळणवळनाचे महत्वाचा दुवा ठरला आहे. आणि सियांग जिल्ह्याला याचा खुप फायदा झाला. आसामच्या जुनाई येथून हा पुल जवळ आहे.

अरुणाचल ते ओखा गुजरात या बाबा आमटे यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो अभियानला २५ वर्ष पुर्ण झाली म्हणून डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ईटानगर ते शांती निकेतन भारत जोडो मैत्री यात्रेत ४० दिवस आम्ही संपुर्ण नार्थ ईस्ट स्टेट्स मध्ये मार्च व एप्रिल २०१३ साली फिरत होतो. हिमालयाच्या पर्वत रांगा. प्रचंड मोठ्या खोलदर्या आणी निसर्गाने नटलेल्या या भागात फिरताना विलक्षण आनंद मिळत होता. या भागात नद्या भरपुर असल्याने पाण्याला कमी नव्हती. अरुणाचल प्रदेशाच्या भागातून निघुन पासीघाटच्या जवळ सियांग नदी निघते व जेंव्हा डोंगर संपतो व खाली आसामच्या विस्तिर्ण प्रदेश लागतो व ती पसरट होत जाते. व पुढे ती ब्रम्हपुत्र नदीला मिळते. अरुणाचल मधून ती हिमालयाच्या उंच डोंगरातून खळाळत वाहते तेंव्हा भले मोठे पहाड वाहत आणते. त्या वाहण्याचा प्रचंड आवाज भितीदायक असतो. त्यात माती व प्रचंड दगड असतात. आम्ही जेंव्हा या नदी वरील पूल पाहण्यास आलो तर पाणी नव्हतेच उन्हाळ्याचे दिवस होते. सगळ्या नदी पत्रात दगडच दगड दिसत होते. पात्र विस्तिर्ण होते. हा पूल उर्वरित भारत व सियांग जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा पुल आहे. 1990 पर्यंत इथे पुल नव्हताच. तेंव्हा खुप दुरुन तिकडे जावे लागत. नाही तर नदीतून नावेतून जावे लागे. राजीव गांधी यांच्या पंतप्रधान काळात या पुलाला मान्यता मिळाली. तो पुढे १०-१२ वर्षांच्या काळा नंतर तयार झाला. अरुणाचलला व आसाम मध्ये जाण्यास दळणवळनाचे महत्वाचा दुवा ठरला आहे. आणि सियांग जिल्ह्याला याचा खुप फायदा झाला. आसामच्या जुनाई येथून हा पुल जवळ आहे.

दुसरा पुल आहे तो आसामच्या ब्रम्हपुत्र नदी वरील. या पुलाला बोगिबिल ब्रीज असे नाव आहे. डिब्रूगढ़ जवळ हा पुल धेमाजी व डिब्रूगड सह आसामच्या ईतर भागाला दक्षिण उत्तर जोडणारा महत्वाचा पुल आहे. याची मान्यता डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना मिळाली. 2002 साली या पुलाचे काम सुरू झाले होते. पण बोडो अंदोलनामुळे बराच काळ ते काम स्थगित होते. नंतर ब्रम्हपुत्र नदीचे अवाढव्य पात्र ते नेहमी बदलत राहते त्यामुळे अनेक वेळा ते काम वाहुन गेले. त्यानंतर तो पुल आकारत येत असताना तो उडवून देण्यात येईल अश्या धमक्या या भागातील अतिरेकी देत होते. त्यात उल्फा व बोडो अतिरेकी अग्रभागी होते. कारण होते हा पुल झाला तर बांगला देशी स्थलांतरीत परकिय नागरिकांचा संचार वाढेल. हा आरोप उल्फाचा होता. तर बोडो अतिरेकी यांना असामी लोक आमच्या भागात येतील व बहूसंख्यांक होतील. व ईतर कारणाने हा पुल लष्करी संरक्षणात तयार करण्यात यशस्वी झाला. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात तो सुरू झाला. (या पुलाची लांबी ४.४९० मीटर्सचा आसपास आहे.?) खुप महत्वाचा हा पुल पुरोत्तर राज्याला वरदान ठरणारा आहे.

प्रचंड उंच व लांब पुल असल्याने या भागातील पर्यटन वाढीस याचा महत्वाचा सहभाग असणार आहे. या पुलाचे काम चालू असताना आम्ही नावेत बसुन डिब्रूगढ़ला आलो होतो. नावेत जीप, कार, मोटरसायकलीची वाहतुक होत असे. हा प्रवासही आनंद देणारा व तेवढाच भितीदायक होता. डिब्रूगढ़ला आल्यावर एका गुरुद्वारात आमची राहण्याची व्यवस्था केली गेली होती. तीच ब्रम्हपत्रनदी या शहराला वेढा घालुन पुढे जाते. या प्रवासात अनेक वेळा आम्हाला ब्रम्हपुत्रेला ओलांडूनच जावे लागे. हा एक सुखद आनंद देणारा प्रवास होता. पुढे मी ब्र्म्हपुत्र नदीला जाहीर पत्रच लिहिले व ते पत्र पुणे येथील चपराक या साप्ताहिकात घनश्याम पाटील यांनी प्रसिध्द केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News