डोक्यात दगड घालून तरूणीची हत्या; संशयित ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020
  • पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरण परिसरात तरूणीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे प्रकरण काल उघडकीस आले आहे.
  • मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला असल्याने पोलिसांनी परिसरात चौकशी सुरू केली आहे.

पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरण परिसरात तरूणीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे प्रकरण काल उघडकीस आले आहे. मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला असल्याने पोलिसांनी परिसरात चौकशी सुरू केली आहे. मुलीवर अतिप्रसंग करून हत्या केली असावी असा पोलिसांचा संशय आहे. 

भामा आसखेड धरण परिसरात झुडपात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मृतदेहाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. त्याचबरोबर मृतदेहाच्या शरिरावर कपडे सुध्दा नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी सांगितली. नातेवाईकांनी आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी पोलिसांकडे केली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

पोलिस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने, पोलिसांनी दोन संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आरोग्य खात्याकडून आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं चाकण पोलिसांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News