पैशाच्या वादातून तरूणाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020

अशोकच्या खिशात असलेले १८ हजार घेऊन संदीप तिथून पसार झाला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर संदीप सोनवणेची पोलिसांनी अधिक चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलिसांना खरा प्रकार सांगितला. 

पैशाच्या वादातून तरूणाची हत्या 

सिन्नर ते नाशिक महामार्गाला लागून असलेल्या घाट परिसरात टेकडीवर तरूणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करीत त्या तरूणाची ओळख पटवण्यात यश मिळविले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे पोलिसांनी संशयित संदीप सोनावणे याला ताब्यात घेतले आहे. 

मृत तरूणाचे नाव अशोक महाजन असून तो नाशिक औद्योगिक वसाहत परिसरात कंपन्यांमध्ये रंग देण्याचे काम करत होता. मागच्या आठवड्यात मृत अशोक महाजन औद्योगिक वसाहत घेण्यासाठी गेला होता. तेव्हापासून तो गायब होता. त्याचदरम्यान मोहदरी घाटात एक मृतदेह आढळला, पोलिसांनी चौकशी केली असता तो मृतदेह अशोकचा असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर पोलिसांनी परिसरात चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित संदीप सोनवणे याला ताब्यात घेतले. 

संदीपची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली. अशोक आणि संदीप हे दोघेजण अशोकच्या कामाचे पैसे घेण्यासाठी औद्योगिक वसाहतीत गेले होते. तिथून परत येत असताना संदीपने अशोककडे ७०० रूपयांची मागणी केली. अशोकने पैसे देण्यास नकारअशोकच्या खिशात असलेले १८ हजार घेऊन संदीप तिथून पसार झाला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर संदीप सोनवणेची पोलिसांनी अधिक चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलिसांना खरा प्रकार सांगितला.  दिल्याने चिडलेल्या संदीपने डोक्यात दगड घालून अशोकची हत्या केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News