विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीसह मित्राची हत्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020
  • काही दिवसांपासून नागपूरात संचारबंदी असल्याने नागपूर शांत होतं. परंतु संचाबंदीची मर्यादा संपुष्टात आल्याच्या काही तासातचं अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीची आणि तिच्या मित्राची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

नागपूर - काही दिवसांपासून नागपूरात संचारबंदी असल्याने नागपूर शांत होतं. परंतु संचाबंदीची मर्यादा संपुष्टात आल्याच्या काही तासातचं अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीची आणि तिच्या मित्राची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अवघ्या काही तासातचं ताब्यात घेतलं आहे. हा धक्कादायक प्रकार नागपूर शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. 

नागपूर शहरातील बेसा परिसरात कल्याणेश्र्वर परिसरात ही घटना घडली आहे. मयत पत्नी किरण बरमेया यांचे शिवा नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पती भारत बरमेया याला होता. त्यामुळे पती-पत्नीत वारंवार वाद होत होते. 

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून भारतने पत्नी किरण आणि तिचा मित्र शिवा यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. 

दोन्हीही मृतदेश शवविच्छेदनासाठी आरोग्य खात्याच्या ताब्यात दिले आहेत. मृतदेहाचा अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा ठरवली जाईल, असं नागपूर पोलिसांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News