मुंबईचा सांस्कृतिक इतिहास आणि वारसा सांगणार ठिकाण

स्वप्निल भालेराव
Saturday, 13 April 2019

डॉ. भाऊ दाजी लाड हे ललित आणि औद्योगिक कला वास्तूच्या माध्यमातून मुंबईचा इतिहास व सांस्कृतिक वारसा मांडत.

मुंबई - डॉ. भाऊ दाजी लाड हे मुंबई शहरातले हे सर्वात जून वास्तुसंग्रहालय पूर्वाश्रमीच व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम . १८५७ साली जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले. डॉ. भाऊ दाजी लाड हे ललित आणि औद्योगिक कला वास्तूच्या माध्यमातून मुंबईचा इतिहास व सांस्कृतिक वारसा मांडत.

आधुनिक कला प्रकाराचा प्रारंभीचा काळ तसेच मुंबई संस्थानातील विविध समुदायानी जोपासलेली कुशल कारागिरी अधोरेखित करतात. मातीत घडवलेली लघुशिल्प, नकाशे, पाषाणावर केलेले लिखाण, छायाचित्रे व अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतचा शहराचा व शहरवासीयांचा इतिहास सांगणारी दुर्मीळ पुस्तके यांचा समावेश आहे. विविध वयोगटातील जनतेसाठी चित्रपट प्रदर्शन, संगीत सभा, अभ्यास वर्ग, व्याख्यानांचे आयोजन केले जाते. २००५ साली युनेस्कोने संग्रहालयाला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित केले. 

म्युझियम कट्टा' या कार्यक्रमातून कवी, लेखक, कलाकार, अभिनेते, निर्माते इतिहास व वर्तमानकालीन सामाजिक विषयावर संगीत, नाटक, लघुपट, चर्चासत्र सादरीकरण करतात. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. 

नोंदणी :-  https://bit.ly/2KhzGxG मर्यादित आसनव्यवस्था, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.

संपर्क :- www.bdlmuseum.org 

दूरध्वनी :- +९१२२२३७३१२३४
 
कसे जाल :-

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग),  ९१/ ए, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा पूर्व, मुंबई ४०००२७. भायखळा (सेन्ट्रल रेल्वे स्थानक) ५०० मीटर अंतर.

प्रदर्शनाची वेळ :- १०.०० ते ६.०० 

सुट्टी :- सोमवार बंद.

प्रवेश शुल्क :- लहान मुले (वय ६-१२) ५ रु. प्रौढ १० रु.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News