परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाने लॅन्च केले नवे अँप; वाचा कसे चालते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020

सोमवारी आणि मंगळवारी परीक्षा आयोजित केल्या जातील. त्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना युजर नेम आणि पासवर्ड देण्यात आले.

मुंबई : काळाची पावले ओळखून मुंबई विद्यापीठाने कात टाकली आणि आधुनिकतेची कास धरली. सहज आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी विद्यापीठाने एक परीक्षा ॲप लॉन्च केले. चेन्नई येथील खासजी कंपनीने परीक्षा अँपची निर्मिती केली. त्याद्वारे घरबसल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. सध्या प्रायोगीक तत्वावर विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षेसाठी अँपद्वारे घेतल्या जाणार आहेत. येत्या सोमवारी आणि मंगळवारी परीक्षा आयोजित केल्या जातील. त्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना युजर नेम आणि पासवर्ड दिले. वेबिनारद्वारे प्राध्यापकांचे प्रशिक्षण देण्यात आले. ज्यांना अद्यापही युजरनेम आणि पासवर्ड मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना लवकरच युजरनेम, पासवर्ड देण्यात येणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आपल्या मोबाईल, संगणक, लॅपटॉपद्वारे परीक्षा देण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

कोणत्या परीक्षा अँपद्वारे घेतल्या जाणार?

युजी, पीजी नियमीत विद्यार्थी, दुरशिक्षण, मुक्त शिक्षण अशा सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा अँपद्वारे घेण्याचा विचार  आहे. त्यासाठी सर्व विभागाच्या प्राध्यापकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या आडचणी सोडवल्या जाणार आहे असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

अँप डाउनलोड कसे करावे? 

लॅपटॉप, संगणक, डेस्कटॉपसाठी विंडोज 8.1 ऑपरेटिंग सिस्टिमच्या वरचे व्हर्जन असणे आवश्यक आहे. तर मोबाईलसाठी 5.1 ऑपरेटिंग सिस्टिमच्या पुढचे व्हर्जन असलेल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. स्मार्टफोन 4 जीबी रॅमचा असावा तर  2 जीबी मोकळी जागा असावी, अशा स्थितीत परीक्षा अँप सुरळीत चालेल असे अँप निर्मिती कंपनीकडून सांगण्यात आले.

सध्या बहुतांश विद्यार्थ्यांकडे 2 जीबी रॅम आणि 8 ते 16 जीबी इंटरनल स्टोरेज क्षमतेचे मोबाईल आहेत तर संगणकावर विंडोज 7 हे व्हर्जन आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा ॲप डाऊनलोड करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षा ॲप विकसित केले तर बहुतांश विद्यार्थ्यांना अँपचा फायदा झाला अशा प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी दिल्या. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News