Mumbai university: पदवी प्रवेश पुर्व नोंदणीची शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 August 2020

आता पाच ऑगस्ट २०२० दुपारी एक पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर उद्या सहा ऑगस्ट २०२० रोजी सकाळी अकरा वाजता गुणवत्तेनुसार पहिली लिस्ट जाहीर होणार आहे.

मुंबई : अनेक दिवसापासून सुरु असलेली प्रथम वर्ष पदवी प्रवेश नोंदणीची तारीख एक दिवसांनी वाढवण्यात आली. आज बुधवारी (ता.०५) १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

काही तांत्रीक कारणामुळे विद्यार्थ्यांना नोंदणीच्या वेळी समस्या उद्धभवल्या होत्या. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अर्ज करणे शक्य झाले नाही. पुर्वी चार ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याची अंतिम तारीख होती. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची संधी मिळावी यासाठी एक दिवसांनी नोंदणीची तारीख वाढवण्यात आले. आता पाच ऑगस्ट २०२० दुपारी एक पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर उद्या सहा ऑगस्ट २०२० रोजी सकाळी अकरा वाजता गुणवत्तेनुसार पहिली लिस्ट जाहीर होणार आहे. गुणवत्ता यादीत नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तपासणी आणि फी भरण्याची प्रक्रीया करावी लागणार आहे.

प्रवेश प्रक्रीयचे वेळापत्रक

  • पदवी प्रवेश पुर्व ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख : ५ ऑगस्ट दुपारी १.०० पर्यंत
  • नोंदणी केल्यानंतर अर्जाची हार्ड कॉपी विद्यापीठात सादर करणे :  ५ ऑगस्ट  दुपारी ३.०० पर्यंत
  • प्रथम मिरीट लिस्ट : ६ ऑगस्ट सकाळी ११ वाजता 
  • प्रमाणपत्र तपासणी आणि फी : ६ ते ११ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यं
  • द्वितीय मिरीट लिस्ट: ११ ऑगस्ट सायंकाळी ७ वाजता
  • प्रमाणपत्र तपासणी आणि फी: १२ ते १७ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत
  • तृतीय मिरीट लिस्ट- १७ ऑगस्ट सायंकाळी ७ वाजता
  • प्रमाणपत्र तपासणी आणि फी :  १८ ते २१ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News