राष्ट्रीय हॉकीत मुंबई शालेय संघटनेचा संघ कायम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 July 2020
  • 'एक राज्य, एक संघटना' या नियमांतर्गत मुंबई हॉकी संघटनेची सहसंलग्नता हॉकी इंडियाने रद्द केली असली, तरी मुंबईतील वयोगटातील हॉकीपटूंसाठी महाराष्ट्राकडूनच राष्ट्रीय स्पर्धा हा पर्याय राहिला नसून त्यांना मुंबई शालेय क्रीडा संघटनेकडूनही राष्ट्रीय स्पर्धेत खेळता येणार आहे.

मुंबई :- 'एक राज्य, एक संघटना' या नियमांतर्गत मुंबई हॉकी संघटनेची सहसंलग्नता हॉकी इंडियाने रद्द केली असली, तरी मुंबईतील वयोगटातील हॉकीपटूंसाठी महाराष्ट्राकडूनच राष्ट्रीय स्पर्धा हा पर्याय राहिला नसून त्यांना मुंबई शालेय क्रीडा संघटनेकडूनही राष्ट्रीय स्पर्धेत खेळता येणार आहे.

हॉकी इंडियाने एप्रिलमध्ये राष्ट्रीय स्पर्धेचे स्वरूप बदलले. त्यात अधिकाधिक खेळाडूंना संधी मिळण्यासाठी किशोर गटात राज्य तसेच अकादमीचे संघ त्याचबरोबर कुमार गटात राज्य, सार्वजनिक क्षेत्र संघ तसेच अकादमीच्या संघांना खेळवण्यास प्रवेश दिला आहे; मात्र त्याचवेळी कोणाही खेळाडूस एकाच प्रकारच्या राष्ट्रीय स्पर्धेत एकाच गटात खेळता येईल, असे जाहीर केले आहे. अर्थातच त्यामुळे मुंबईतील नवोदित हॉकीपटूंना १६ तसेच १९ वर्षाखालील गटात खेळण्याची संधी मुंबई शालेय क्रीडा संघटनेकडून लाभणार आहे.

हॉकी इंडियाने अकादमीच्या स्पर्धेसाठी एकंदर ३३ संघांची निवड केली आहे. त्यात मुंबई शालेय क्रीडा संघटनेचा समावेश आहे. त्यात नामधारी, महाराजा रणजीत सिंग, तमिळनाडू, पीएनबी, मध्य प्रदेश, चंडिगड, माळवा या हॉकी अकादमींचा समावेश आहे. अर्थातच ही अकादमीची स्पर्धा १६ तसेच १९ वर्षांखालील गटाबरोबरच मुलांच्या तसेच मुलींच्या विभागात होणार आहे.

मुंबई शालेय क्रीडा संघटनेचा संघ चार वर्षांपासून राष्ट्रीय किशोर हॉकी स्पर्धेत सहभागी होत आहे. हा संघ चांगली कामगिरी करीत आहे. आम्हाला आता आगामी राष्ट्रीय स्पर्धांपासून अकादमीच्या किशोरप्रमाणेच कुमार गटासाठीही संघ पाठवता येणार आहे. अर्थातच आम्ही त्याची तयारी करून घेणार आहोत, असे मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे हॉकी सचिव लॉरेन्स बिंग यांनी सांगितले.

मुंबईतील शालेय हॉकी स्पर्धेबाबत

 

  • चार वयोगटात मुला-मुलींसाठी स्पर्धा
  • १०,१२,१४ आणि १६ वर्षांखालील गटात चुरस
  • एकंदर ११८ संघांचा सहभाग, त्यात मुलींचे एकंदर २८ संघ
  • दहा गटात स्पर्धा, त्यात एकंदर दोन हजार १२४ खेळाडूंचा सहभाग

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News