मुंबईत पालक व विद्यार्थ्यांची शालेय साहित्याच्या खरेदीची लगबग सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

नवी मुंबई - शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले असल्याने पालक व विद्यार्थ्यांची शालेय साहित्याच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. या वर्षीही विविध डिझाइन्सची रंगीबेरंगी दफ्तर (बॅग), बॉटल, कंपास पेटी, जेवणाचा डबा, वह्या, पेन, पेन्सिल यांनी दुकाने सजली आहेत. अनेक विक्रेत्यांनी पालकांना आकर्षित करण्यासाठी या साहित्याच्या खरेदीवर सूट ठेवली आहे. विविध ऑफरमुळे एकाच वेळी जास्त साहित्य खरेदी करण्यावर पालक भर देत आहेत.

दुकानातून आपल्या आवडत्या कार्टुन कॅरेक्‍टरच्या व हटके डिझाइन्सच्या पेन्सिल, पेन, दफ्तर, डबा, बॉटल आदी साहित्याची खरेदी करण्यासाठी बच्चेकंपनी उत्सूक दिसत आहे.

मिनियनच्या आकाराच्या वस्तूंंसोबत डोनट, फुले, स्प्रिंग, लायटिंग, डॉल्स तसेच विविध फळे व प्राण्यांच्या आकाराच्या पेन्सिल, पेन, कंपास पेटीला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
डीमार्ट, बिग बाजारमध्येही शालेय साहित्याची खरेदी होत आहे; परंतु त्यापेक्षा आमच्याकडे जास्त डिस्काउंट व गॅरंटी देत असल्याने स्पर्धा जाणवत नसल्याचे सीवूड येथील विजय स्टोअर्सच्या विक्रेत्यांनी सांगितले. 
शाळेतून सक्तीने होणाऱ्या विक्रीचा आमच्या व्यवसायावर होत असल्याचे उमंग स्टेशनरीच्या विक्रेत्यांनी सांगितले.

शाळांतूनही शालेय वस्तूंची विक्री
काही शाळांमधून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच वह्या, पुस्तके व शाळेच्या गणवेशाची विक्री करण्यात आली असल्याने दुकानांमधून हे साहित्य कमी प्रमाणात विकले जात आहे. हे साहित्य शाळेतूनच घेण्याची सक्ती काही शाळांमध्ये होत असल्याने पालक नापसंती व्यक्त करत आहेत. बाजारात घाऊक दरात वस्तू मिळत असल्या तरी शाळेने सांगितलेल्या दरातच या वस्तू घ्याव्या लागत असल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News