मुंबई इंडियन्स खुश ! ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज संघात दाखल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 September 2020

मुंबई इंडियन्स खुश ! ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज संघात दाखल

कोरोनाच्या काळात 'आयपीएल' यावर्षी होणार नाही असं चाहत्यांना समजलं आणि जगभरातले चाहते नाराज झाले. कारण मागील १२ मोसमात आयपीएलचे जगभरात चाहते निर्माण झाले आहेत. पण यंदाचं आयपीएल आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होणार आहे. आज सायंकाळी साडेसात वाजता आयपीएलच्या १३ व्या मोसमाला सुरूवात होईल. कोरोनाच्या काळात अनेकांना अर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकजण शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या खचले होते. अशा खचलेल्या क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटची लस दिलासा देईल, अशी आशा आहे.  मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा आज पहिला शीख जाएद स्टेडियम, अबुधाबी येथे सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

दोन्ही संघ यांच्या आगोदर अनेकदा खेळलेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येक खेळाडूंचा गेम माहित आहे. परंतु ही स्पर्धा युक्त अरब अमिरातीत असल्याने कोण जिंकू शकेल हे कोणीचं सागू शकणार नाही असं क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं त्यांनी सोशल मीडियावरती मांडलं आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ख्रिस लीनला संघात सहभागी करून मुंबईने फलंदाजीची बाजू अधिक बळकट केली.                     

दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतात ३० मार्चला आयपीएलचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु कोरोनाचा शिरकाव भारतात झाला आणि भारतातलं चित्र बदलून गेलं. ते अजून आहे तसंच आहे. त्यानंतर ही स्पर्धा १५ एप्रिलला होईल असं जाहीर करण्यात आलं. परंतु परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने बीसीसीयने यंदाचं आयपीएल अमिराती क्रिकेट मंडळाच्या साथीने संयुक्त अरब अमिरातीत ठरवलं. विशेष म्हणजे पहिल्यांदाचं ही स्पर्धा रिकाम्या मैदानात होणार आहे.

मुंबई संघाकडे अनुभवी संघ

गतविजेता मुंबईचा संघ यंदा चांगल्या तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माने आत्तापर्यंत चारवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, कारण संघात नेहमी अनुभवी खेळाडूंचा भरणा असतो. यंदा मुंबई इंडियन्स संघाकडे अनुभवी  खेळाडू लसिथ मलिंगा नाही. पण जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लेनेघन असे वेगवान त्रिकूट त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तसेच कृणाल आणि हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड यांच्या रूपात मुंबईकडे गुणवान अष्टपैलूसुद्धा आहेत.

चैन्नई सुपर किंग्ज

नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीसाठी ही ‘आयपीएल’ नक्कीच खास असेल. आत्तापर्यंत चेन्नईच्या संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आठवेळा अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यंदाचं आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतल्याने संघाला निश्चिच फटका पडला आहे. त्यामुळे यंदा नव्याने संघ बांधणी करण्यात आली आहे. परंतु अमिरातीतील खेळपट्टय़ांवर फिरकीच्या बळावर सामने जिंकवून देण्यासाठी चेन्नईकडे इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा, पीयूष चावला असे अनुभवी गोलंदाज उपलब्ध आहेत.

विशेष

आतापर्यंत २८ वेळा दोन्ही संघात आमनेसामने झाले असून मुंबईने १७, तर चेन्नईने ११ सामने जिंकले आहेत.
मागच्या पाच सामन्यात मुंबईचा विजय झाला आहे
१२ मोसमात मुंबई-चेन्नई सुरूवातीचा सामना खेळला आहे. त्यापैकी मुंबईने दोन सामने जिंकले आहे. तर चेन्नईने एक जिंकला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News