मुंबई क्रिकेट संघटना हंगामी सुधार समितीची नेमणूक करणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

मुंबई क्रिकेट संघाच्या मार्गदर्शक तसेच निवड समिती सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय क्रिकेट सुधार समिती घेत असते.

मुंबई : वार्षिक सर्वसाधारण सभा नजीकच्या कालावधीत होण्याची शक्‍यता कमी असल्यामुळे मुंबई क्रिकेट संघटना हंगामी क्रिकेट सुधार समिती नेमण्याचा विचार करीत आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव संजय नाईक आणि सहसचिव शाह आलम खान यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या सदस्यांकडून हंगामी क्रिकेट सुधार समिती नियुक्तीबाबत मत मागवले आहे. आता संघटनेचे संलग्न 365 सदस्य याबाबत आपले मत कळवतील आणि त्यानुसार क्रिकेट सुधार समितीची हंगामी नियुक्तीचा निर्णय होईल. मुंबई क्रिकेट संघाच्या मार्गदर्शक तसेच निवड समिती सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय क्रिकेट सुधार समिती घेत असते.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या घटनेनुसार क्रिकेट सुधार समितीची निवड संघटनेच्या वार्षिक सभेत होत असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत वार्षिक सभा घेणे अवघडच आहे. मात्र क्रिकेट मोसम सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिल्यानंतर त्यानंतरच्या योजना तयार करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी हंगामी क्रिकेट सुधार समितीची गरज आहे. याचे अधिकार देण्याबाबतचे आपले मत ई- मेलद्वारे कळवण्यात यावे, असे पत्र लिहिण्यात आले आहे.

वासिम जाफर आणि चंद्रकांत पंडित यांनी मुबईव्यतिरिक्त अन्य संघांचे मार्गदर्शक होण्यास मंजुरी दिल्यानंतर माजी खेळाडू नाराज झाले. त्यांनी क्रिकेट सुधार समितीची तातडीने नियुक्ती करून मार्गदर्शकांची निवड करावी, अशी सूचना केली होती. या समितीसाठी लालचंद राजपूत, राजू कुलकर्णी आणि समीर दिघे यांच्या नावाची चर्चा होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News