Click, the two act mime play : मुंबईत रंगला तब्बल दोन तास तरुणांच्या मुकनाट्याचा प्रयोग

यिनबझ टीम
Saturday, 15 February 2020

सध्या मूकनाट्याला कठीण आणि दुर्लक्षित नाट्य प्रकार म्हणून नेहमीच ओळखले जाते, मात्र भारतातल्या किंबहुना महाराष्ट्रातल्या तरुणांनी हे वाक्य मोडून काढलं आहे.

सध्या मूकनाट्याला कठीण आणि दुर्लक्षित नाट्य प्रकार म्हणून नेहमीच ओळखले जाते, मात्र भारतातल्या किंबहुना महाराष्ट्रातल्या तरुणांनी हे वाक्य मोडून काढलं आहे. मुंबईतल्या माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदीरामध्ये तब्बल दोन तासांचे 'क्लिक दी टू अॅक्ट माइम प्ले' (Click,  the two act mime play) हे मुकनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थित दर्शवली होती. प्रख्यात सिने- नाट्य अभिनेते श्री. विजय पाटकर,  गानसम्राज्ञी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर, सिने-अभिनेते श्री. गणेश यादव, अभिनेत्री सुषमा देशपांडे, सुशील इनामदार, टाईमपास फेम प्रथमेश परब, अभिनेत्री ऋतुजा बागवे, अभिनेते संजय खापरे असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विपुल काळे दिग्दर्शित आणि चेरीटेल्स प्रकाशित 'क्लिक दी टू अॅक्ट माइम प्ले' हे दोन तासांचे विशेष मूकनाट्य भारतात पहिलीवेळ सादर झालं आहे. यावेळी मुकनाट्यामधील प्रभावी व्यक्तीमत्व श्री. विजय पाटकर यांची मुलाखतदेखील घेण्यात आली. आपलं मूकाभिनयाशी असलेलं नातं पाटकर यांनी या मुलाखती दरम्यान सांगण्याचा प्रयत्न केला, विशेष म्हणजे मूकनाट्यासारख्या कठीण व दुर्लक्षित नाट्य प्रकाराला इतक्या मोठ्या स्तरावर आणल्याबद्दल निर्माते अमेय समर्थ आणि स्विटी वर्तक यांचे त्यांनी कौतुक केले.

सदर मूकनाट्यं हे युरोपिअन शैलीवर आधारित होते, सोबतच यात दोन कथांचा समावेश करण्यात आला होता.  या दोन्ही कथा छायाचित्रकारांच्या आयुष्यावरून आधारित असल्याने क्लिक हे नाव देण्यात आलं होतं. आयुष्यातील एक क्लिक तुमच्या संपूर्ण जिवनाला कशाप्रकारे कलाटणी देणारी ठरू शकते, हे अत्यंत सुंदररित्या मांडण्याचा प्रयत्न विपुल काळे यांच्यासह सहकलाकारांनी केला आहे.

कोणत्याही भाषेचा, शब्दांचा वापर न करताही चेहऱ्यावरच्या हावभावांनी मनातली गोष्ट सर्वसामान्य प्रेक्षकाला जेव्हा समजते, तेव्हा त्या मुकनाट्याचे सार्थक होते असे म्हणतात, असाच प्रयत्न यावेळी करण्यात आला. मुकनाट्य सादर करत असताना प्रेक्षकांचे उत्तमरित्या मनोरंजनही कसे करता येईल, याचा प्रयत्नही विपुल यांची टीन घेत असते. 

यावेळी प्रकाश योजना अमोघ फडके व युगांत पाटील, संगितकार आदित्य काळे यांच्यासोबत पूर्वा कौशिक, मयुरेश खोले आणि इतर 22 कलाकारांनी आपल्या देहबोलीतून आणि चेहेऱ्याच्या हावभावातून या मुकनाट्याला प्रेषकांपर्यंत पोहोचवले. येत्या काळात या नाट्याचे अधिकाधिक प्रयोग करून प्रेक्षकांना या सुंदर कलाप्रकाराची पर्वणी देण्याचा चेरीटेल्सचा मानस असल्याचे निर्माते अमेय समर्थ यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News