सदोष बचावाचा मुंबईला फटका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 20 August 2019

हरियाणा स्टीलर्सने प्रो कबड्डीतील लढतीत मुंबईवर​ २७-३० अशी बाजी मारली

चेन्नई ः स्टार आक्रमक विकास कंडोलासमोर यू मुम्बाचा बचावही कोलमडला. त्यामुळे हरियाणा स्टीलर्सने प्रो कबड्डीतील लढतीत २७-३० अशी बाजी मारली.  मुंबईच्या बचावातील चुकाही हरियाणाच्या पथ्यावर पडल्या.

मुंबई आक्रमणात कमी आहेत, हे लक्षात घेऊन हरियाणाने खेळास जोरदार सुरुवात केली. बोनस गुणांच्या नादात मुंबईच्या आक्रमकांकडून चुका झाल्या. विकास कंडोलाने एकाच चढाईत तिघांना बाद केल्यामुळे मुंबईवर लोण चढला. 

विश्रांतीस मुंबई ८-१६ मागे होते; पण त्यांनी अभिषेक सिंगला मैदानात उतरवले. अभिषेकच्या प्रभावी चढायांना भक्कम बचावाची साथ लाभली. त्यामुळे मुंबईची पिछाडी दहा मिनिटांत दोन गुणांची झाली; पण त्याच वेळी रवी कुमार आणि चांद सिंगने मुंबई बचावाला चुका करण्यास भाग पाडले. पुन्हा मुंबईची पिछाडी १७-२५ झाली. 

संदीप नरवालच्या चढायांनी मुंबईला जीवदान दिले. तीन मिनिटे असताना मुंबईची पिछाडी एका गुणाची झाली; पण अखेर विजय त्यांच्यापासून दुरावलाच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News