मराठीतही मल्टीस्टारर चित्रपट

सकाळ वृत्त संस्था (यिन बझ टीम)
Wednesday, 6 March 2019

संदीप साळवे आणि अक्षया हिंदळकर या नव्या जोडीचा ‘रॉकी’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. या चित्रपटांमधील ॲक्‍शन सीन्सची झलक यामध्ये पाहायला मिळाली. ‘रॉकी’ची खासियत म्हणजे हा मल्टीस्टारर चित्रपट आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत मल्टीस्टारर चित्रपटांचा ट्रेण्ड नव्याने सुरू झाला असताना आता मराठीतही मल्टीस्टारर चित्रपट येत आहेत. संदीप-अक्षयाबरोबरच अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

शिवाय बॉलीवूड अभिनेता राहुल देव या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘ड्रीम व्हीवर प्रोडक्‍शन्स’ आणि ’सेवेन सीज प्रोडक्‍शन्स’ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अदनान ए. शेख यांनी केले आहे. मराठीतील हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या ८ मार्चला चित्रपटगृहांत दाखल होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News